टाकळी येथील शिवेश्वर विद्यालयास सामाजिक वनीकरण विभागाद्वारे पर्यावरण उपक्रमाने सन्मानित
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील टाकळी येथील शिवेश्वर माध्यमिक विद्यालयास विभागीय वनिकयण विभाग कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत शिवेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी अंतुर या विद्यालयाला उत्कृष्ट पर्यावरण उपक्रम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 15 ऑगष्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे सामाजिक वनिकरण विभाग यांच्या द्वारे आयोजीत कार्यक्रमात शिवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास विभागीय सामाजिक वनिकरणधिकारी यांच्या वतिने पर्यावरण उपक्रमाने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यात उपवनसंरक्षक सामाजिक वनीकरण बाळकिशोर पोळ, कल्पना टेमगिरे ,उप जिल्हाधिकारी , अंजली धानोरकर, सहाय्यक वन संरक्षक शिल्पा फुले आणि सोनिया शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
शाळेने पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड, स्वच्छता मोहिमा सीड बाॕल , बीज राखी शाडो माती गणपती , पक्षासांठी कृञीम घरटे पर्यावरणपूरक आकाश कंदील गणपती मखर ,झाडांना राखी बांधून संवर्धन कंपोस्ट खत निर्मिती,पतंग मांजा जनजागृती प्लास्टिक मुक्ती साठी उपक्रम व विद्यार्थ्यांमध्ये हरित जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.विद्यालयास मिळालेल्या यशाबद्दल डॉ.टी.पी.पाटील मा.शिक्षणाधिकारी ,तसेच धारेश्वर शिक्षण संस्था अध्यक्षा सौ.वत्सलाताई पाटील ,प्राचार्य संदिप पाटील जि.प.सदस्य यांनी आनंद व्यकत केला असून उपप्राचार्य अशोक सपाटे, सामाजिक वनीकरण विभाग प्रमुख सुस्ते सर, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले. पुढील काळातही पर्यावरणपूरक उपक्रम जोमाने राबवण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.