शेख अब्दुल रहीम यांचा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या सदस्यत्वाचा आणि राज्य प्रवक्ता पदाचा राजीनामा!
पदाला न्याय दिल्याने मी हा निर्णय घेतला आहे; शेख अब्दुल रहीम
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या राज्य प्रवक्ता पदाचा आणि सदस्यत्वाचा शेख अब्दुल रहीम यांनी संघटनचे राज्य सरचिटणीस सचिन चव्हाण आणि संस्थापक अध्यक्ष शिवराम घोती यांना व्हॉट्सॲप आणि इमेलद्वारे सादर केले. शेख अब्दुल रहीम यांनी संघटनेचे सदस्य आणि राज्य प्रवक्ता म्हणून जवळपास 3 वर्ष 5 महिन्यांच्या कार्यकाळात अनेक विद्यार्थी- शिक्षकांचं अनेक प्रश्न मार्गी लावले. परंतु महत्वाचा मुद्दा म्हणजे जुनी पेन्शन हा मुद्दा मार्गी लागला नाही म्हणून शेख अब्दुल रहीम यांनी हा संघटनेच्या सदस्यत्वाचा आणि राज्य प्रवक्ता पदाचा राजीनामा सादर केला. राजीनामा स्विकारून पदमुक्त आणि कार्यमुक्त करावे अशी विनंती केली आहे. शेख अब्दुल रहीम पुढे म्हणाले की मी या पदाला न्याय देऊ शकलो नाही ही माझी जबाबदारी समजून मी आज रोजी सदस्यत्वाचा आणि राज्य प्रवक्ता पदाचा राजीनामा सादर केला आहे.