Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबाद15 ऑगस्ट निमित्त वंशिका फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना १५ सतरंजी पट्ट्या व खाऊचे...

15 ऑगस्ट निमित्त वंशिका फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना १५ सतरंजी पट्ट्या व खाऊचे वाटप

15 ऑगस्ट निमित्त वंशिका फाऊंडेशनतर्फे शालेय विद्यार्थ्यांना १५ सतरंजी पट्ट्या व खाऊचे वाटप
आत्ताच एक्सप्रेस
पुणे-   गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेत १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वंशिका फाऊंडेशनतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांना १५ सतरंजी पट्ट्या व खाऊचे वाटप करण्यात आले.
 शाळेतील विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व नागरिकांनी कौतुक केले.
कार्यक्रमास वंशिका फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेश्मा सातपुते, सचिव विशाल सातपुते, अमोल सातपुते, माऊली मोरे व समाधान काटे, जयसिंग डोंगरे, मुख्याध्यपिका जयश्री कासार, रणजित बोत्रे, गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे, विशाल चव्हाण .
 उपस्थित होते.
या वेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्याविष्कार व भाषणांच्या माध्यमातून देशप्रेम व्यक्त केले. ध्वजारोहणानंतर रंगलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून नेत्रदीपक सादरीकरण केले.
फाऊंडेशनच्या सामाजिक बांधिलकीतून घेण्यात आलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला तसेच देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली. वंशिका फाऊंडेशनच्या या कार्याचे सर्व उपस्थितांनी मनःपूर्वक स्वागत केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments