Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादस्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन जिल्हा सहकार बँकेच्या अनुकंपाधारक पात्र 52 उमेदवारांना नियुक्ती...

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन जिल्हा सहकार बँकेच्या अनुकंपाधारक पात्र 52 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन जिल्हा सहकार बँकेच्या अनुकंपाधारक पात्र 52 उमेदवारांना नियुक्ती पत्र प्रदान

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा सहकार बँक येथे बँकेतील कार्यरत कर्मचारी मयत झाल्यानंतर शासन धोरणानुसार बँकेच्या मंजुर पॅटर्नच्या 20% या प्रमाणे एकुण पात्र 52 वारसांना जिल्हा सहकार बँकेच्या हॉलमध्ये माजी पालकमंत्री तथा माननीय आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती पत्र स्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास माननीय आमदार अब्दुल सत्तार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्याकडे पाठपुरावा करुन सन 2001 पासुन अनुकंपाची भरती बँकेत झालेली नव्हती त्यास मंजुरीचे प्रयत्न करुन त्यांना बँकेच्या नोकरी मध्ये सामावून घेण्याकरीता मार्ग मोकळा केला. याप्रसंगी माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेबांनी नविन नियुक्ती मिळालेल्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन करुन अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे पाटील साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना अब्दुल सत्तार यांनी भरतीसाठी केलेल्या विशेष प्रयत्नाचे कौतुक करुन सर्व संचालक मंडळाच्यावतीने आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक करतांना बँकेचे कार्यकारी संचालक मुकुंद मिरगे यांनी बँकेच्या प्रगतीचा अहवाल मांडला, त्यामध्ये बँकेचे नेट एनपीए 4.60% पर्यंत खाली आल्याचे सांगीतले व 78% अल्प मुदती शेती कर्ज, पिक कर्ज वाटप करुन जिल्हयातील अग्रणी बँक ठरली आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष किरण पाटील यांनी अब्दुल सत्तार यांचे जिल्हा बँकेस लाभत असलेल्या विशेष सहाकार्याबद्दल त्यांचे सर्व संचालक मंडळाच्या वतीने आभार मानले. याप्रसंगी नियुक्ती मिळालेल्या सर्व 52 उमेदवार व त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व संचालक मंडळाचे आभार मानून सामुहीक सत्कार केले.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील, जावेद पटेल, कृष्णा पाटील डोणगांवकर, अप्पा पाटील, सुहास शिरसाट, जगन्नाथ काळे, प्रभाकर काळे, डॉ.दिनेश परदेशी, रामहरी जाधव, अ‍ॅड.विशाल कदम, रामदास पालोदकर, सरव्यवस्थापक अजय मोटे, सरव्यवस्थापक अण्णा वडेकर, कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विश्वासराव गाढे, कर्मचारी युनियन अध्यक्ष एस.वाय.डकले यांच्या सह सर्व व्यवस्थापक, विभाग प्रमुख, लोन ऑफीसर, अकौंट ऑफीसर, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments