बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांना ‘समृद्धी’चा तिसरा हप्ता जाहीर
100 रुपये प्रति टन प्रमाणे जमा होणार उसाचे बिल
घनसावंगी: ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला उच्चांकी दर देणारा समृद्धी साखर कारखान्याने बैलपोळा सणानिमित्त ऊस बिलाचा तिसरा हप्ता गुरुवारी जाहीर केला. गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये गाळप झालेल्या उसासाठी 100 रुपये प्रति मे. टन प्रमाणे हा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी दिली.
समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी गाळप हंगाम २०२४ -२५ साठी शेतकऱ्यांच्या उसाला २९७० रुपये प्रती मे. टन प्रमाणे दर जाहीर केला आहे. त्यानुसार पहिला हप्ता २५०० प्रती मे. टन प्रमाणे तर दुसरा हप्ता 200 प्रती मे. टन प्रमाणे यापूर्वी कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केला आहे. आता बैलपोळा सणानिमित्त 100 रुपये प्रति मे. टन प्रमाणे तिसरा हप्ता देण्याचा निर्णय चेअरमन सतीश घाटगे पाटील यांनी घेतला असून लवकरच तिसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
