Thursday, October 30, 2025
Homeऔरंगाबादपत्रकार बाळासाहेब आडागळे व अभिनेत्री प्राची सोनवणे यांना सत्यशोधक पुरस्कार जाहिर!

पत्रकार बाळासाहेब आडागळे व अभिनेत्री प्राची सोनवणे यांना सत्यशोधक पुरस्कार जाहिर!

पत्रकार बाळासाहेब आडागळे व अभिनेत्री प्राची सोनवणे यांना सत्यशोधक पुरस्कार जाहिर!
अभिनंदनिय :  उल्लेखनिय कार्याची दखल 
माजलगा/प्रतिनिधी/ महाराष्ट्र आधार सेना सामाजिक संघटना व दैनिक महाराष्ट्र आरंभ यांच्या संयुक्त विद्यमानाने  यांच्याकडून विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सत्यशोधक पुरस्कार देवून गौरव केला जातो. यावर्षीचा सत्यशोधक पुरस्कार पत्रकार बाळासाहेब आडागळे व अभिनेत्री प्राची सोनवणे यांना घोषित झाला आहे. हा पुरस्कार मा.पालकमंत्री धनंजय मुंडे, मा. आ. अमरसिह पंडित यांच्या सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे येत्या रविवार (दि.१७) रोजी प्रदान केला जाणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र आधार सेना संघटना चे संस्थापक अध्यक्ष संपादक दिपक थोरात  यांच्याकडून देण्यात आली आहे.
  बीड जिल्ह्यातील माजलगाव येथेल रहिवाशी असलेले पत्रकार बाळासाहेब आडागळे  हे गेल्या पंधरा वर्षीपासून पत्रकारीतेच्या माध्यामातून आपल्या लेखणीने अनेक अन्यायाला वाचा फोढण्याचे काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना पत्रकार क्षेत्रातील राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्काराने प्रदान करण्यात येणार आहे. तसेच कमी कालावधीत आपल्या अभिनयाच्या जोरावर उल्लेखनीय काम करणारी अभिनेत्री प्राची सोनवणे हिच्या  कार्याची दखल घेत, त्यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त कला क्षेत्रातील राज्यस्तरीय सत्यशोधक  हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments