Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादजिव गेला तरि चालेल पण गायरान व वन जमिन सोडणार नाहीत ;-सोयगावात...

जिव गेला तरि चालेल पण गायरान व वन जमिन सोडणार नाहीत ;-सोयगावात गायरान व वन धारक शेतकरी आक्रमक

जिव गेला तरि चालेल पण गायरान व वन जमिन सोडणार नाहीत ;-सोयगावात गायरान व वन धारक शेतकरी आक्रमक
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी दुपारी एक वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतिने गायरान व वन धारक  शेतकरी, शेतमजूर,ऊस तोड कामगार, यांच्या विविध मागण्यासाठी तास भर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलन कर्त्यांनी विविध मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार संभाजी देशमुख यांना दिले दरम्यान छत्रपतीसंभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांनी जिल्हा अधिकारी यांनी १७ जुलै २०२५  रोजी  आदेश काढून गायरान व वन जमिन खाली करण्याचे आदेश अधिकारया ना दिले होते. यामुळे गायरान व वन जमिन कसणाराया मध्ये दाहशतीचे व चितेचे वातावरण तयार झाले आहेत.त्यामुळे सोमवारी आंदोलन कर्त्यांनी शासनाच्या निषेध नोंदवीत रस्ता रोको आंदोलन केले.दरम्यान आंदोलन कर्ते रस्ता रोको झाल्या वर दुपारी दोन वाजता पुन्हा तहसील कार्यालयात धडकले यावेळी कॉम्रेड अभय टाकसाळ, कोम्रेड सय्यद अनिस यांनी आंदोलन कर्त्यांच्या वतीने नायब तहसिलदार संभाजी देशमुख यांच्याशी विविध मागण्यांसाठी चर्चा केली गेल्या अनेक वर्षी पासून हे लोक गायरान व वन जमिन कसून आपला व आपल्या कुटूब्याच्या उद्धार निर्वाह करतात. आम्ही गायरान व वन जमिन सोडणार नाहीत आमचा जिव भीं गेला तरी चालेल अशा निर्धार त्यांनी केला. गायरान व वन जमिन खाली करण्याचा आदेश तत्काळ मागे घ्यावा. गायरान व वन जमिन नावावर करा, ऊस तोड कामगारांना ऊस तोड़ी च्या ठिकाणी निवासाची व्यवस्था करण्यात यावी, ऊस तोड कामगारांच्या मुलांना निवासी शाळेची व्यवस्था करा. सोयगाव तालुक्यात मजबूत रस्ते तयार करा. ग्रामिण भागात बसचे फेरया वाढविण्यात यावे. बे घरांना घरे देण्यात यावे, ग्रामिण भागात मनरेगाचे कामे सुरू करा. मजूरांच्या मजूरीत वाढ करा.अश्या मागण्याचे निवेदन नायब . तहसिलदार संभाजी देशमुख यांना देण्यात आले. यावे वेळी अण्ड कॉम्रेड अभय टाकसाळ, कॉम्रेड सय्यद अनिस, कॉम्रेड त्रिबक शेजूळ, कॉम्रेड प्रताप चव्हाण, यांनी मार्गदर्शन केले. एक तास सुरू असलेल्या या रस्ता रोको मुळे वाहाण्याचे खूप मोठे रागा लागल्या होत्या. पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. यावेळी असलम मिर्झा,अरुण राठोड, भरत वाघ कलीम तडवी, सुभाष राठोड, सुनिता राठोड, शेख अजिम, सौरभ पवार, शेख नदिम, कैलास चव्हाण, तमिजा तडवी, लालचंद चव्हाण, संतोष गायकवाड, जयराम पवार, भिकन जाधव, विश्वनाथ जाधव, मोहन चव्हाण, भागवत करपे, सय्यद भिकन, रमेश सोनवणे, शेख कासम, समाधान गायकवाड, यशवंता गायकवाड, श्रावण गायकवाड आदि या रस्ता रोको आंदोलनात उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments