स्वतंत्र प्रयोगशाळेसाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश
वर्ष २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग स्थान येथेही भाविक मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता लक्षात घेता, या कालावधीत भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी विशेष तयारी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी यावेळी दिले. त्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र अन्न, पदार्थ तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले. रासायनिक व उपकरणीय तपासणी, औषध नमुने, साधने, उपकरणे, आणि प्रशिक्षित कर्मचारी व अत्याधुनिक संसाधनयुक्त प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशा सुचना त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिल्या. त्याचबरोबर बाटली बंद पिण्याचे पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करणे, अश्या पाण्याच्या युनिट्सची संपूर्ण तपासणी करण्याचे व त्यावर फिरत्या पथकांमार्फत तपासणी करण्याचे निदे्रश देण्यात आले.
