महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे धाकलगावात स्वागतजालना/प्रतिनिधी/महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल असलेले धाकलगाव येथे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सत्कार केला.यावेळी बदनापूर मतदार संघाचे आमदार नारायण कुचे यांची उपस्थिती होती. आगामी काळातील होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बीड वरून जालन्याकडे जात असताना धाकलगाव येथे स्वागतासाठी तीन जेसीबीच्या सहाय्याने बावनकुळे यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्ते तसेच धाकलगाव येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी धाकलगावच्या ग्रामस्थांनी बावनकुळे यांना पाणंद रस्त्यांच्या कामासाठी निवेदन दिले. यावेळी बावनकुळे यांनी संबंधितविभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी विजय खटके,बाळासाहेब नाझरकर, भगवान बर्वे, अरुण घुगे, राजेंद्र छल्लारे, राजू उंडे, मुन्ना पठाण, नामदेव गाढे, राजेंद्र पवार, महादेव शेडगे आदी उपस्थित होते.
