प्रवाह परीवार (अनाथालयात)  रक्षाबंधन उत्साहात साजरा
विहामांडवा 
आताच एक्सप्रेस
पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार अनाथालय च्या मुला मुलींनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण भावाच्या नात्याच्या सर्वात मोठा उत्सव म्हणजे रक्षाबंधन सन हा असतो भारतीय  संस्कृतीमध्ये या सणाला फार महत्त्व दिले जाते प्रवाह परिवारांमधील मुलींनी मुलांच्या हातावर राखी बांधून  रक्षाबंधन सन साजरा केला आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार अनाथालयातील अनाथ, निराधार मुला-मुलींनी  रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा केला
प्रवाह अनाथालयात सुमारे ३२ अनाथ मुल-मुली राहतात या मुलांना व मुलींना बहिण भावाची कमी भासू नये म्हणून भाऊ बहिणींच नात घट्ट करणारा रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.  या रक्षाबंधनचे अनेक स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी  प्रवाह परिवार अनाथालयाचे संस्थापक प्रा.रामेश्वर गोर्डे व प्रा.हेमा रामेश्वर गोर्डे हे उपस्थित होते.
प्रवाह परिवार ही संस्था मागील सहा वर्षापासून कार्यरत आहे. अनाथ निराधार बेघर व परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित असलेल्या मुला-मुलींसाठी ही संस्था प्रामुख्याने काम करत आहे. या संस्थेमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, सोलापूर, अहमदनगर, पुणे आणि नाशिक इत्यादी सात जिल्ह्यातील एकूण 32 मुलं मुली आहेत. यामध्ये 17 मुली तर 15 मुले आहेत. या संस्थेस कुठल्याही प्रकारचे अनुदान नसून ही संस्था रामेश्वर गोर्डे यांच्या माध्यमातून चालवत आहे.