मधमाशी शेतकऱ्यांची मित्र कीटक त्यांचे संवर्धन करणे गरजेचे – अविनाश गायकवाड
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/ खादी आयोगाचे केंद्रीय मधमाशी पालन व प्रशिक्षण संस्था पुणे व स्वरदर्शन सांस्कृतिक व सामाजिक बहुद्देशीय संस्था ग्रामोदय प्रकल्प वाळूज ता गंगापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सभागृह तुरकाबाद येथे ९ ऑगस्ट आदिवासी दिनानिमित्त एकदिवसीय मधमाशी पालन जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उदघाटन जैवविविधता समिती अध्यक्ष माजी सभापती सौ ज्योतिताई गायकवाड यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ योगिता पाटेकर, यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष श्री अजीम पटेल ,आत्मा कृषी समितीचे समन्वयक श्री दिलिप मोटे, ग्रामपंचायत सदस्य संदीप पानकर,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री सुदाम गायकवाड, ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौ वंदना पवार, सुवर्णा गायकवाड आदींची उपस्थिती होती मधमाशी च्या कार्यप्रणाली ,व जोडव्यावसायसंबंधी महत्वाचे मार्गदर्शन श्री अविनाश गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ जान्हवी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार उमेश गंगवालयांनी केले त्यावेळी उपस्थित मान्यवरांची यटोचीत भाषणे झाली मधुमक्षिका पालन विषयी विविध माहिती व रानभाज्या विषयी चे विविध स्टॉल प्रदर्शनात शेतकरी बांधवाना बघायला मिळाले.