नगर आष्टी साबलखेड या रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारीत जाण्यासाठी मार्ग ठेवलाच नाही 
 पाणी जाण्यासाठी लवकर उपाययोजना करा ; नसता आंदोलन करू
कडा/प्रतिनिधी/  नगर आष्टी साबलखेड या रस्त्याच्या चालू कामात सध्या दोन ठिकाणी पावसाचे पाणी साचून चिखल व पाण्याचा ढव साचत असल्याने रस्त्यावरून ये जा करण्यात लोकांना कसरत करावी लागत आहे संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करूनही दखल घेऊन कायमस्वरूपी उपाय करत नाहीत. थातूरमातूर कामे करून वेळ काढु पणा करत आहेत. हा प्रश्न लवकरच मार्गी लावा अन्यथा याच साचलेल्या चिखलात भोपळा,बेशरमच्या फांद्या घेऊन लोटांगण आंदोलन करणार असे सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.नगर,आष्टी साबलखेड या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून चालू आहे या रस्त्याच्या काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गटारी बनवल्या परंतु जेव्हा हा रस्ता बनवला त्या वेळी रस्त्यावरील पावसाचे पाणी गटारीत जाण्यासाठी जे पाईप लाऊन जागा केली होती ती रस्त्याच्या खाली बुजवून टाकली त्यामुळे पाऊसाचे पाणी जाण्यासाठी जागाच राहिली नाही. परिणामी कडा गावातील दावलमलिक (शादवल) दर्गा समोर ५० फुटांपेक्षा जास्त लांब व २० फुटांच्या आसपास रूंदी इतका रस्ता कायमच पावसाच्या पाणी व चिखलात भरलेला असतो त्यामुळे या देवस्थानात ये जा करण्यात कसरत करावी लागत आहे.तसेच वाहने हि घसरत आहेत.यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त आहे. या ठिकाणच्या साचलेल्या पाणी चिखलाचे फोटो व्हिडिओ संबंधित अधिकाऱ्यांना व्हाट्सअप वर पाठवून विनंती केली परंतु आजपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत.या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत तर याच साचलेल्या पाण्या- चिखलात भोपळा, बेशरमच्या फांद्या घेऊन लोटांगण आंदोलन करणार याची नोंद घ्यावी. तसेच कडा या गावातील मोठा पुल बनवला आहे त्या पुलावरही पाण्याचे डबके चिखल साचलेले आहे त्यावर हि उपाययोजना करण्यात यावी.