बिबट्यांची पिल्ले दिसल्यास जवळ जाऊ नका – वनाधिकारी शिवाजी टोणपे
कन्नड/ कन्नड तालूका हा संपूर्णता दऱ्याखोर्याणी व्यापलेलाअसुन निसर्गाची मनसोक्त उधळण या तालुक्यावर परमेश्वराने केलेली आहे.त्यामुळे या तालुक्यात बिबटे व इतर हिंश्र वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळून येतात.असे जीव अथवा बिबट्यांची पिल्ले आपल्या शेतातील ऊस,मक्का किंवा इतर अडोशाचे जागी आढळून आल्यास कृपया त्यांचेकडे जाऊ नका किंवा त्यांना स्पर्श करून इतरत्र ठिकाणी हलवीण्याचा प्रयत्न करू नका,करण मादी व बिबट्या त्या पिलांचे संवरक्षणार्थ आसपासच बसलेले असतात व ते आक्रमक होऊन उचलणाऱ्यावर हल्ला करू शकतात त्यामुळे अशावेळी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधून माहीती द्यावी व मानव – वन्यजीव संघर्ष टाळून मानव – वन्यजीव सहजीवनाचा स्वीकार करून मनुष्य निसर्ग संतुलनास हातभार लावावा असे आव्हान कन्नड प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी श्री.शिवाजी टोणपे यांनी केले आहे.
