लासुर स्टेशन येथे संबोधी बुध्द विहार येथे वर्षावास निमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र ग्रंथाचे वाचन भंते उपाली बोधी हे करतात
सब्ब पापस्स अकरणं, कुशलस्स उपसंपदा । सचित्त परियोदपनं, एतं बुद्धान सासनं ।।
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन अशोक कॉलनी येथील संबोधी बुध्द विहार येथे वर्षावास निमित्त व पंचक्रोशीतील उपासक आणि उपासिका यांना दि, १०, जुलै पासून आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा पर्यंत ९०, दिवस भंते उपाली बोधी, हे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पवित्र ग्रंथाचे वाचन करतात दरम्यान धम्म या पवित्र ग्रंथाचा पठणाची सुरवात सायंकाळी ७, वाजे पासून ते रात्री ८,३०, वाजेपर्यंत भंते उपाली बोधी हे उपासक उपासिका यांना मार्गदर्शन व तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचा वाचन करून संबोधित करतात वर्षवास निमित्ताने लासुर स्टेशन परिसरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.