सारोळा नगरीत छंत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे आगमन मंगळवारी
कन्नड/प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील सारोळा पंचक्रोशीतील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष, पोलीस पाटील, शालेय समिती पदाधिकारी व ग्रामस्थांना कळविण्यात येत आहे की, सारोळा नगरीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आगमन दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी मंगळवारी मोठ्या थाटामाटात होणार आहे.त्यानंतर दि. ६ ऑगस्ट २०२५ रोजी (बुधवार) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा संपन्न होणार आहे. हा अनावरण सोहळा श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी परमानंद गिरिजी महाराज व ह.भ.प. महादेव महाराज निपाणीकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
या अनावरण सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे ठरविण्यात आला आहे:
सकाळी ११.०० वाजता – ह.भ.प. महादेव महाराज निपाणीकर यांचे काल्याचे कीर्तन.दुपारी १.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण सोहळा
दुपारी २.०० वाजता – श्री श्री १००८ स्वामी परमानंद गिरिजी महाराज यांचे अमृतमय प्रवचन
नंतर महाप्रसाद वितरण