Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादहफीज अली यांची गब्बर अॅक्शन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

हफीज अली यांची गब्बर अॅक्शन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

हफीज अली यांची गब्बर अॅक्शन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

हफीज अली यांची कामाची दखल घेत संघटनेचे अध्यक्ष मकसूद अंसारी यांनी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती दिलेली आहे.
छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/  जनसामान्यांच्या हक्कांसाठी लढणारी अग्रगण्य संघटना गब्बर अॅक्शन संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी हफीज अली यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गब्बर ॲक्शन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेख मकसूद अन्सारी यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत, त्यांना ही जबाबदारी दिली. हफीज अली हे गेल्या दहा वर्षांपासून गब्बर अॅक्शन संघटनेमध्ये सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांची ओळख एक लोकप्रिय, लढवय्ये आणि जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक म्हणून आहे.
हफीज अली यांनी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, तसेच महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डामध्ये सामान्य नागरिकांच्या विविध समस्या वेळोवेळी ठामपणे मांडल्या आहेत. त्यांनी शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा बाबत नागरिकांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत., रस्त्यावरील खड्डे, वक्फ बोर्डातील भ्रष्टाचार, तसेच संजय गांधी निराधार योजनेबाबत प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
तसेच, महावितरण (MSCB) कंपनीतून जनतेचे वीजविषयक प्रश्नही अनेकदा त्यांनी उठवले असून, तिथेही प्रभावीपणे जनहिताची बाजू मांडली आहे.
त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि धडाडीच्या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर नियुक्त केले आहे.
संघटनेचे सचिव प्रविण बुरांडे कार्याध्यक्ष इम्रान पठाण, छावणी परिषद उपाध्यक्ष शेख हनीफ ऊर्फ बब्बु, अब्दुल कय्यूम पत्रकार,इस्माइल राजा, हसन शाह, आझम शेठ मॉडर्न, नासिर पठाण, विलास मगरे, शेख रशीद जालना दिपक जाधव जालना, मोहम्मद युसुफ नांदेड, जफर खान परभणी, हमीद शेक ठाणे मुंबई, अजुम मकरानी नाशिक, शफीक शेख मालेगांव, सय्यद मुसा अहमदनगर, रियाज बागवान, शेख शेरू, सय्यद खलील,sayyed इस्माइल, अशफाक बागवान, माजेद कुरेशी,इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या या निवडीचे स्वागत करत, पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments