Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादआनेगावच्या जिल्हा परिषद शाळेने गुणवंत विद्यार्थी घडवून आदर्श निर्माण 

आनेगावच्या जिल्हा परिषद शाळेने गुणवंत विद्यार्थी घडवून आदर्श निर्माण 

आनेगावच्या जिल्हा परिषद शाळेने गुणवंत विद्यार्थी घडवून आदर्श निर्माण 
स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न
केज/प्रतिनिधी/  शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्यांचा भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील एम टी एस या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
   यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. पौळ,प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार दत्तात्रय मुजमुले,सेवानिवृत्त शिक्षक कविदास हांडीबाग,रामराव इंगळे, सुर्यकांत जाधव, जालिंदर इंगळे उपस्थित होते. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो असे शाळेचे उपक्रमशील शिक्षक जयराम मांगडे बोलताना सांगितले. आनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतून एम टी एस.या शासनाच्या मान्यता प्राप्त स्पर्धा परीक्षेसाठी 10 विद्यार्थी परीक्षेस सामोरे गेले होते त्यातील आठ विद्यार्थ्यानी गोल्ड आणि सिल्वर मेडल पटकावले आहे.आशिष सूर्यकांत जाधव, समर्थ अशोक हंडिबाग, अपेक्षा सिद्धाम हंडिबाग ज्योती रामराव इंगळे,शंभुराजे रजनीकांत हंडिबाग,आरोही अशोक हंडिबाग अविष्कार अशोक इंगळे,ईशाणी धैर्यशील इंगळे, रुद्र बळीराम शिकारे,नंदिणी व्यंकट इंगळे आदी विद्यार्थ्यानी गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल पटकावले होते.त्यांचा मेडल,प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
      ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेच्या शाळा इतर शाळेपेक्षा कमी नाहीत हे आनेगाव येथील जिल्हा परिषद शाळेने दाखवून दिले आहे.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत या शाळेतील उपक्रमशील शिक्षकांनी शाळेची वेगळी ओळख निर्माण करत जिल्हा परिषद शाळेचा दर्जा उंचावला असल्याचे मत पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांनी बोलताना व्यक्त केले.
   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक जयराम मांगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ट्रेनी शिक्षक पूनम इंगळे यांनी केले.यावेळी गावातील नागरिक माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments