Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादचिश्तीया महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

चिश्तीया महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

चिश्तीया महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

खुलताबाद/प्रतिनिधी/  खुलताबाद येथे चिश्तिया महाविद्यालयामध्ये शुक्रवारी (ता. एक) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुभाष बागल हे होते. डॉ. बागल यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या समग्र जीवनावर प्रकाश टाकला. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचे प्रश्न, त्यांचे जगणे, त्यांच्या समस्या आपल्या साहित्यातून अधोरेखित केल्या.

अण्णाभाऊंनी प्रदीर्घ अशा प्रकारची साहित्य निर्मिती करून वंचित बहुजनांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सय्यद असिफ झकेरिया हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अशोक भालेराव यांनी केले. तर आभार डॉ. अफरोजा खातून यांनी मानले. प्रारंभी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. सुनील जाधव प्रा. आसाराम पवार, प्रा. अर्थिया कादरी, प्रा. शेख अफसर, प्रा. रामटेके, प्रा. मुजाहिद अर रहेमान यासह विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments