छ.शिवाजी महाराज महाराजस्व व महसूल दिन शिबीरा निमित्य प्रशासन नागरिकांच्या दारी
कन्नड/ दि.1ऑगस्ट रोजी महसूल दिन तथा छ.शिवाजी महाराज महाराजस्व दिनाचे औचित्य साधून शासन तथा प्रशासना अंतर्गत नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांचा थेट लाभ गाव पातळीवरील नागरिकांना देण्यात यावा या एकमेव
उद्देशाने कन्नडचे प्रशासन थेट तडपिंपळगावी पोहोचले होते.
दि.1ऑगस्ट रोजी कन्नडच्या आमदार सौ.संजनाताई जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत तडपिंपळगाव या गावी शासनाने सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु केलेल्या विविध विकास योजणांचा लाभ गावपातळीवर जाऊन नागरिकांना थेट देण्यात यावा,या साठी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय कन्नड चे संयुक्त वतीने ताडपिंपळगावात या गावी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या आयोजित शिबिरात शेतकरी,कष्टकरी,जेस्ट नागरीक,विद्यार्थी,कामगार ई.साठीं रहिवासी, जात प्रमाणपत्र,उत्पन्नाचा दाखला, वृद्धकाळ पेन्शनचा लाभ, कृषी लाभ,क्रिमिलीयर प्रमाणपत्र, पाणीपुरवठा, घरकुल योजना, संजय गांधी, श्रावण बाळ, शिधापत्रिका, उत्पन्नाचे दाखले सह कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजणांचा लाभ थेट लाभार्थी नागरिकांच्या दाराशी मिळवून देणेसाठी कन्नडचे उपविभागीय अधिकारी संतोष गोरड,तहसीलदार विद्याचरण कडवकर,नायब तहसीलदार काळे,सह दोन्ही कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी वर्गाने या शिबिरात सहभाग नोंदवून लाभार्थ्यांना जागेवरच प्रमाणपत्रे व लाभ मिळवून दिला.यामुळे तडपिंपळगाव गावातील नागरिकांनी आमदार व प्रशासकीय अधिकारी वर्गाचे लाभ मिळवून दिल्या बद्दलआभार म्हणून समाधान व्यक्त केले.या आयोजित केलेल्या शिबिरामुळे अनेक लाभार्थ्यांना मोठा फायदा झाला.या आयोजीत शिबिराचे सर्वत्र कौतुक होतांना दिसून आले.उपस्थित अधिकारी वर्गासही आपण गावपातळीवर थेट जाऊन नागरिकांना लाभ मिळवुन दिल्या बद्दल आनंद