कल्याण कांजुले पाटील यांची भ्रष्टाचार विरोधी समितीच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
औरंगाबाद/प्रतिनिधी/ सतत समाजसेवेत अग्रेसर असलेले कल्याण कांजुले पाटील यांची भ्रष्टाचार विरोधी समितीच्या औरंगाबाद शहर उपाध्यक्षपदी शहराध्यक्ष सलीम यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भ्रष्टाचार विरोधी समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष सय्यद साबेर यांच्या मान्यतेनुसार करण्यात आली आहे.
कल्याण पाटील हे दौलताबाद गावचे असून, त्यांचे वडील स्व. दौलतराव कांजुले पाटील हे त्या गावाचे सरपंच होते. समाजसेवेची परंपरा पुढे नेत कल्याण पाटील यांनी विविध सामाजिक उपक्रमात सहभाग घेऊन जनतेमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या वेळी समितीचे शहर अध्यक्ष सलीम शरीफ शेख यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करत त्यांचे शेख लाला, शाहीन बाजी पठाण,अभिनंदन केले.
नियुक्तीनंतर कल्याण पाटील यांनी सांगितले की, “ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आहे. भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी मी समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे कार्यरत राहीन.”