Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादमराठवाड्याची तहान भागविणारा नाथसागर जलाशय लवकरच १००% भरणार

मराठवाड्याची तहान भागविणारा नाथसागर जलाशय लवकरच १००% भरणार

मराठवाड्याची तहान भागविणारा नाथसागर जलाशय लवकरच १००% भरणार

पैठण/प्रतिनीधी/ पैठण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहर परिसरात झालेल्या सतत पावसामुळे  नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे जनजीवन विस्कळीत झाले होते तर नाथसागर (जायकवाडी) धरणातील पाणीसाठा आता ८८.६४ ईतक्या टक्क्यांवर पोहोचला असल्याची माहिती धरण शाखेचे गणेश खरडकर यांनी दिली आहे.
सततच्या पावसामुळे शासकीय कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उपस्थितीवर परिणाम झाला आहे.शनिवारी नाथसागर धरणात १७२४७ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील साठा धरणाची पाणी पातळी फुटामध्ये१५१९.६३धरणाची पाणी पातळी मीटरमध्ये४६३.१८३एकूण पाणीसाठा दलघमी२६३४.९३८जिवंत पाणीसाठा दलघमी१८९६.८३२ येत्या काही काळात केव्हाही पाटबंधारे विभागाकडून जलपूजन करून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे. या  खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली असून, प्रशासन आणि जलसंपदा विभाग सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. जलसंपदा विभागाकडून गोदापात्राच्या आजूबाजूस रहिवाश्यांनी सतर्क तेचा ईशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments