बीड जिल्ह्यामध्ये मुली चा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिल- ॲड.
प्रविण मेटे
केज/प्रतिनिधी/ बीड जिल्ह्यामध्ये मुलींचे प्रमाण कमी झाल्यामुळे मुला मुलीच्या संख्येमध्ये तफावत वाढत चालली आहे, म्हणून माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये राजेगाव येथे जन्माला येणाऱ्या गावातील प्रत्येक मुलीच्या नावे पाच हजार रुपये ग्रामपंचायतीच्या वतीने एफ .डी करण्यात येणार आहे, तसेच ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हावी म्हणून ग्रामपंचायत कडून माझ्या कार्यकाळात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना गावातून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने स्वर्गीय आमदार.विनायक रावजी मेटे साहेब यांच्या नावे बारावीत पहिला येणाऱ्या विद्यार्थ्यास रोख रक्कम व सन्मान चिन्ह तसेच, दहावीला गावातून पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्यास माजी सरपंच स्वर्गीय नारायणरावजी मेटे यांच्या नावाने रोख रक्कम व सन्मान चिन्ह पुरस्कार देण्याचा ठराव घेण्यात आला.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना त्या गुणवंत विद्यार्थ्याबरोबर त्याच्या पालकांचाही सत्कार करण्याचा ठराव घेण्यात आला तसेच राजेगाव ग्रामीण रुग्णालयात राजेगाव, दैठणा, माळेवाडी,बोरगाव इत्यादी गावासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते, त्या शिबिरामध्ये आंबेजोगाई येथील सर्व विभागाचे तज्ञ डॉक्टर शिबिरात उपस्थित होते तसेच राजेगाव च्या पाण्याची टाकी ते दैठणा या गावाच्या रस्त्यासाठी बी अँड सी ऑफिस कडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा चालू आहे तसेच या रोड साठी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, बीड जिल्ह्याचे खासदार, राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील यांना निधीसाठी मागणी करून पाठपुरावा चालू आहे तसेच सर्व शेतकऱ्यांना शेती उद्योगधंद्यात वर्ग करावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देशाचे कृषिमंत्री यांना पत्र व मेल पाठवून शेतीला उद्योगाचा दर्जा द्यावा म्हणून पाठपुरावा चालू आहे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा संचालक झाल्यापासून परिसरातील शेतकऱ्यांना ऊसाला चांगला भाव मिळावा म्हणून सतत प्रयत्न चालू होता. कारखान्याच्या अंतर्गत गंगा माऊली शुगर सुरुवातीपासून शेतकऱ्याला ऊसाला भाव द्यावा म्हणून पाठपुरावा करून आतापर्यंत झालेल्या गळीत हंगामा मध्ये गंगा माऊली शुगरने परिसरातील शेतकऱ्यांना चांगला भाव दिला व आणखीन भाव वाढवून मिळावा म्हणून पाठपुरावा चालू आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे शिक्षण मिळावे म्हणून जिल्हा परिषद शाळा चांगल्या उत्तम प्रकारे शिक्षण मिळावे म्हणून व विद्यार्थ्यांचा जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश वाढवा व दर्जेदार शिक्षक उपलब्ध व्हावेत म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सतत पाठपुरावा चालू आहे भविष्यामध्ये ग्रामीण भागातील तरुणाचं रोजगारासाठीच होणारच स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे व ग्रामीण भागातील तरुणांना आपल्याच गावांमध्ये आपल्याच भागामध्ये रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी भविष्यात प्रयत्न करणार आहेत ग्रामीण भागात लहान मोठी उद्योग उभा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.