रविंद्र दिवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार)सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम तालुका अध्यक्षपदी नियुक्तीछत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी/ दौलताबाद येथील समाजसेवक रविंद्र दिवेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीची अधिकृत घोषणा पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी केली.नियुक्तीपत्र सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे यांच्या हस्ते देण्यात आले.रविंद्र दिवेकर यांनी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेतला असून, गरजू आणि वंचित घटकांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.नियुक्तीनंतर रविंद्र दिवेकर यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून, “सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून मागासवर्गीय, वंचित आणि शोषित घटकांच्या हक्कासाठी लढा देण्याचा प्रयत्न करणार आहे,” असे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वजीत चव्हाण, शहराध्यक्ष खाजाभाई शरफोद्दीन, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उद्धव बनसोडे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाक पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष सैय्यद लायकोद्दीन,गंगापूर तालुका अध्यक्ष शेख नईम,एकनाथ गायकवाड,विद्यार्थी संघटनेचे शोएब पटेल, कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण थोरात आदिंची उपस्थिती होती.त्यांच्या या निवडीमुळे दौलताबाद परिसरात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
