जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे एक पेड माँ कें नाम उपक्रम यशस्वी
दै आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/ सोयगाव तालुक्यातील उपक्रमशिल शाळा जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे सोयगाव गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व सोयगाव केंद्रप्रमुख फिरोज तडवी याच्या मागर्गदर्शनाखाली एक पेड माँ कें नाम उपक्रमांतर्गत संपूर्ण विद्यार्थ्याना लिंब,पेरू,कहीठ,वड,चिंच,सिताफळ,गुलमोहर या झाडाची रोपे देऊन विद्यार्थ्यानी आपल्या आई सोबत ही झाडाची रोपे शाळेचा परीसर,घराच्या समोर,शेतात लावली तसेच रोपे जगविण्याची हे झाड माझे आहे त्याची मी काळजी घेईन अशी शपथ घेतली.यावेळी पालक पार्वताबाई कुडके,लताबाई ठोंबरे,लताबाई गायकवाड,मनिषा जेठे,विद्या कळवत्रे,प्रतिभा इंगळे,वैशाली पवार यांनी रोपे वाटपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून शाळे समोर वृक्षारोपण केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सहशिक्षक गोपाल चौधरी यांनी विद्यार्थ्याना वृक्षाचे आपल्या जिवनातील महत्व यावर मार्गदर्शन केले.शाळेला रोपे नगरपंचायत सोयगाव व वनविभाग सोयगाव याच्या कडून मिळाली.एक पेड माँ कें नाम उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील,सहशिक्षक गोपाल चौधरी,प्रशिक्षक शिक्षक शुभम देसले यांनी परिश्रम घेतले.