माजलगाव बस स्थानकात खिसेकापु चोरास माजलगाव शहर पोलीसांकडुन अटक
माजलगांव/प्रतिनिधी/ रोजी फिर्यादी नामे धनंजय किसनराव ताटे रा. परळी यांनी फिर्याद दिली की, ते नविन बस स्थानक माजलगाव येथुन बीड येथे जात असताना बस मध्ये चढताना गर्दिचा फायदा घेवुन एका अज्ञात चोरट्यने फिर्यादी यांचे खिशामधुन रोख रक्कम २२,०००/- काढुन घेतले त्यावरुन माजलगांव शहर पोलीस ठाणे येथे गुरनं.२०५/२०२५ कलम ३०३(२) बी.एन.एस.प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याचे तपासात गोपनिय बातमीदार मार्फत माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा हा दत्ता ज्ञानेश्वर गुंजाळ रा. बलभीम नगर पेठ बीड ता.जि.बीड याने कला आहे. त्यावरुन सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार १) सचिन साठे २) चंदु गायकवाड दोघे रा. गांधीनगर बीड यांचेसह कला असल्याचे कबुली दिली व त्यास अटक करुन गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल रोख २२,०००/- रुपये जप्त केला आहे.
सदरची कारवाई नवनित कॉवत, पोलीस अधीक्षक बीड, श्रीमती चेतना तिडके, अप्पर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई, निरज राजगुरु उपविभागीय पोलीस अधिकारी माजलगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ, ग्रेपोउपनि तुळशिराम जगताप, पोहवा/कृष्णा जायभाये, किशोर जाधव, बाळकृष्ण जायभाये. यांनी केली आहे.