साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त 01 आॕगस्ट रोजी जिल्ह्यात ड्राय डे घोषित करण्याची मनसेची मागणी
जालना प्रतिनीधी बबनराव वाघ : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दरवर्षी एक ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते. जयंती उत्सवांमध्ये काही गैरकृत्य करणारे लोक शिरतात व नशा पाणी करून जयंतीला गालबोट लागते. यावेळेस एक ऑगस्ट रोजी मद्याची दुकाने कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने द्यावेत. तसेच काही मेडिकलमध्ये नशा करणाऱ्या गोळ्या मिळतात त्यावर सुद्धा पायबंद घालावा, अशी मागणी आज दिनांक 24 गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता औरंगाबाद चौफुली येथे माध्यमांशी बोलताना राहुल रत्नपारखे यांच्या वतीने प्रशासनाला करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने एक ऑगस्ट रोजी मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले नाही तर त्या विरोधात अण्णाभाऊ साठे प्रेमी मोठ्या प्रमाणात प्रशासनाविरुद्ध आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते साईनाथ चिन्नादोरे, मनसेचे शहराध्यक्ष राहूल रत्नपारखे,बाळू काळे,महेश नागवे यांच्यासह ईतरांची उपस्थिती होती.