नामदेवदादा प्रतिष्ठानच्यावतीने जिल्हा परिषद शाळा तांबवे येथे विद्यार्थ्यांना पुस्तके वाटपइस्लामपूर/प्रतिनिधी/ जिल्हा परिषद शाळा तांबवे येथील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तक संचाचे वाटप नामदेवदादा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पाटील संघटक व युवा उद्योजक सुशांत पाटील प्रतिष्ठानचे कार्यवाहक महेश नवगिरे यांच्या हस्ते पाचवीच्या वर्गातील सर्वच स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना यांच्या हस्ते पुस्तकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक रामराव पाटील सर यांनी केले प्रतिष्ठानचे संघटक सुशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी या पुस्तकांचा अधिक अधिक वापर करून चांगला अभ्यास करावा व तालुक्यात जिल्ह्यात राज्यात स्कॉलरशिप परीक्षेत धवल असे यश संपादन करावे अशा भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक कदम सर होते नामदेवदादा प्रतिष्ठान नेहमीच शाळेने केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत असते शाळेच्या अडचणी दूर करण्यासाठी व शैक्षणिक प्रक्रिया गतिमान करण्याच्या दृष्टीने प्रतिष्ठानचा मोलाचा सहभाग असतो याबद्दल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पी एन पाटील सर व सर्वच पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अरुण व्यक्त केले या कार्यक्रमाचे आभार सौ मुळे मॅडम यांनी मानले
