व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध् – शिरसाठ
परिषदेच्या ठरावांचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – सावे
मराठवाडा व्यापार परिषदेस व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्सफूर्त प्रतिसाद
जालना : छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यातील व्यापारी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध् असून, मुख्यमंत्री व व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईला आमंत्रित करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी रविवारी दिली. तर व्यापार परिषदेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या ठरावावर आमच्या सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी येथे दिले.
मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्सच्या २८ व्या वर्धापनदिनानिमित्त मराठवाडा चेंबर व औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठवाडा व्यापार परिषद रविवारी ‘मसिहा’च्या श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह चिकलठाणा येथे आयोजित केली होती. यावेळी मंत्री महोदय बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा चेंबर ट्रेड अँड कॉमर्स अँड एग्रिकल्चर मुंबईचे माजी अध्यक्ष मानसिंह पवार हे होते. तर उदघाटक व प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री संजय शिरसाठ, कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मराठवाडा चेंबरचे माजी अध्यक्ष सत्यनारायण लाहोटी उपस्थित होते. तर महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष प्रफुल्ल मालानी, मराठवाडा चेंबरचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, कल्याण बरकसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात मराठवाड्यातील सर्व जिल्हा व तालुका पातळीवरील ३०० पेक्षा अधिक व्यापारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या परिषदेत मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष आदेशपालसिंग छाबडा यांनी एकूण दहा ठराव मांडले. त्यास व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. परिषदेत शेवटी मराठवाडा चेंबरचे महासचिव श्यामसुंदर लोया यांनी आभार प्रदर्शन केले. परिषदेस हिंगोलीचे व्यापारी महासंघचे अध्यक्ष तथा माजी आ. गजानन घुगे, नांदेडचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पोकर्णा, सुबोध काकाणी, परभणीचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत हाके पाटील, जालन्याचे जिल्हाध्यक्ष विनीत साहनी, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष संजय कांकरिया, बीडचे कार्याध्यक्ष अशोक शेटे, धाराशिवचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते. परिषद यशस्वी करण्यासाठी मराठवाडा चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेंद्र रेदासणी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत राठी, सचिव संतोष कावळे पाटील, कोषाध्यक्ष विकास साहुजी.
