भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व नागरिकांनी बैठकीस उपस्थित राहावे-डॉ. प्रभाकर ठोके
केज/प्रतिनिधी/ भारतीय बौद्ध महासभेची केज शहर कार्यकारिणी निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले असून सदर बैठकीस भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व समाजबांधणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष डॉ. प्रभाकर ठोके यांनी केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्थापित भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून धम्म प्रसाराचे अविरत कार्य पूर्ण ठेवण्यासाठी भारतात सुनियोजित पद्धतीने सुरु आहे.संस्थेच्या कार्य प्रणालीनुसार दर दोन वर्षांनी शहर कार्यकारिणीची निवड निश्चित करण्यात येत असते.
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा बीड पूर्व अंतर्गत भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा केजचा कार्यकाळ संपुष्टात आलेला आहे म्हणून केज शहर शाखा कार्यकारिणीच्या निवडी बाबत महाराष्ट्र राज्य शाखेच्या आदेशान्वये व संस्थेच्या नियमानुसार नवीन शहर कार्यकारणीची निवड करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.तरी केज तालुका व शहर अंतर्गत सर्व केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, आजी-माजी तालुका व शहर पदाधिकारी, श्रामनेर, समता सैनिक, नियमित दानदाते, धम्म बंधू यांनी बैठकीसाठी रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी शहरातील वेळूवन बुद्ध विहार भीमनगर येथे सकाळी ठीक ११-०० वाजता उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे माजी शहराध्यक्ष आयु. डॉ. प्रभाकर ठोके, सरचिटणीस आयु. जयपाल मस्के, पर्यटन सचिव आयु. महेंद्र मस्के, संस्कार सचिव आयु. चंद्रकांत मस्के व सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
सदरील बैठकीस जिल्हाध्यक्ष आयु. बी. बी. धन्वे, सरचिटणीस आयु.डॉ.एस व्ही बोबडे,कोषाध्यक्ष आयु.प्रा.एस बी.शिंदे, संस्कार उपाध्यक्ष आयु. एस. बी. मोरे, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष डॉ. एस. जे. महाळंगिकर, पर्यटन उपाध्यक्ष आयु. एस. एस. सोनावणे, हिशोब तपासणीस आयु. एम. वाय. काळे, पर्यटन सचिव आयु. के. व्ही. साळवे, आयु प्रा. डॉ. आर. डी. आचार्य, संस्कार सचिव आयु. शामराव वाघमारे, संघटक आयु. भारतराव सातपुते, आयु.मधुकर कदम, आयु. अरुण पटेकर, आयु. बी. सी. डोंगरे, आयु. पंकज भटकर उपस्थित राहणार आहेत.