डि.पी. प्लान संदर्भात पुनर्विचार व गरजू नागरिकांसाठी पुनर्वसनाची मागणी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष
छत्रपती संभाजीनगर/ महानगरपालिकेचे नगर रचना संचालक गरजे यांना एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पूर्व विधानसभा अध्यक्ष शेख समीर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अशरफ पठाण यांनी मागणी केलेली आहे.शहरातील इंदिरानगर बायजीपुरा परिसरातील विकास आराखडा (D.P. Plan) संदर्भात काही गर्भार धावीकडे आपले लक्ष वेधू इच्छितो…
1. स्लम एरियामधील पुनर्वसनः डि.पी. प्लानमध्ये स्लम एरियामधील ज्या नागरिकांची घरे येत आहेत आणि जी घरे बॉण्डवर वैध आहेत, त्या नागरिकांना तात्काळ पुनर्वसनासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून त्यांचे विस्थापन न होता त्यांच्या पुनर्वसनाच्ची योग्य व्यवस्था होईल.
2. गुंठेवारीची रक्कम टप्याटप्याने वसूल करावीः गरीब व economically weaker वर्गातील नागरिकांकडून गुंठेवारीची रक्कम एकरकमी न घेता सक्षमतेनुसार टप्याटप्प्याने घेण्यात यावी, जेणेकरून त्यांना आर्थिक भाराचा ओझा पडणार नाही.
3. गल्ल्या क्रमांक 21 व 29 (इंदिरानगर बायजीपुरा) संदर्भातःइंदिरानगर बायजीपुरा येथील गल्ली क्रमांक 21 व 29 या दोन्ही गल्ल्या डि.पी. प्लानमध्ये येत आहेत. मात्र, गल्ली क्र. 21 च्या जवळच एम.जी. एम. हॉस्पिटलसमोरील 30 मिटर रुंदीचारोड आधीच अस्तित्वात आहे.
तरीसुद्धा नविन डि.पी. प्लानमध्ये त्यावर अतिरिक्त रस्ता दाखवण्यात आलेला आहे, जो अनावश्यक आहे. त्यामुळे याचा पुर्नविचार करावा.
4. वार्ड क्र. 58, 59, 60 चा संपूर्ण चौफेर रोडने वेढलेला परिसरः
पूर्वेलाः एम.जी.एम. हॉस्पिटल – 30 मिटरचा रोड पश्चिमेलाः अपेक्स हॉस्पिटल 18 मिटरचा रोड दक्षिणेलाः कैलासनगर – 18 मिटरचा रोड तसेच उत्तरेकडील सेंट्रल नाका ते VIP फंक्शन हॉल पर्यंत 24 मिटरचा रोड त्यामुळे गल्ली क्र. 29 सुद्धा रस्त्यांनी वेढलेली असून यावर स्वतंत्रे रस्ता डि.पी. मध्ये दाखवण्याची गरज नाही. त्यावरही पुर्नविचार व्हावा.
5. जालना रोड ते चंपा चौकः
जुन्या डी.पी. प्लाननुसार असलेला हा रस्ता जशाच्या तसा ठेवण्यात यावा. त्यास 30 मिटर रुंदीचा करण्याची गरज नाही, अन्यथा स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.
मनपा आयुक्तांना विनंती केली आहे की, वरील सर्व मुद्यांचा गांभीर्याने विचार करून डी.पी. प्लानवर योग्य तो पुर्नविचार करावा व गरीब, झोपडपट्टीवासीय, व मध्यमवर्गीय नागरिकांना न्याय द्यावा.
यावेळी शेख समीर पूर्व अद्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अ, वी, यांचे निवेदन देतांना प्रदेश सचिव अशरफ पठाण, शेख काशिफ, मो, रफि्क, शेख जमीर, तन्वीर खान, शेख युनूस, सयेद मुद्दशीर आदींची प्रमुख उपस्थिती होती.