अखेर त्या शेतरस्ताची दखल घेतली आणि उपसरपंच संपत छाजेड यांनी स्वखर्चाने शेतरस्ताच्या कामाला सुरुवात केली
सावंगी मुंबई नागपूर हायवे लगत असलेल्या शेतरस्ता शेतकऱ्यांना व लहान मुलांना व शेत रस्त्यातून शाळेत जाण्या येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता उपसरपंच संपत छाजेड यांनी या रस्त्याची पाहणी केली आणि स्वखर्चाने शेत रस्त्याच्या कामाला सुरुवात केली.
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील सावंगी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सावंगी गावातील लोकांनी एकत्र येऊन उपसरपंच संपत छाजेड यांना शेतकरी व गावकऱ्यांनी माहिती दिली लहान मुलांसाठी शेतातून शाळेत जाण्यासाठी चिखलाचा रस्ता आहे आणि लहान मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी अडचणी येत आहे पावसाळ्यात चिखल आणि इतर अडचणींमुळे त्यांना शाळेत जाण्यासाठी खूप त्रास होत आहे हे पाहून गावातील लोकांनी एकत्र येऊन उपसरपंच संपत छाजेड यांची भेट घेतली आणि कोणतेही आश्वासन न देता करू बघू होईल असे कारण ना देता प्रत्यक्ष उभे राहून रस्त्याच्या कामाला स्वखर्चाने सुरुवात केली शेतातून शाळेत जाण्यासाठी रस्ता बनवण्याचा निर्णय घेतला.रस्ता तयार झाल्यावर. मुलांना शाळेत जायला सोपे होईल या कामासाठी गावातील लोकांनी व शेतकऱ्यांनी उपसरपंच संपत छाजेड यांचे आभार मानले दरम्यान लहान मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी होणारा त्रास वाचला.
उपसरपंच यांच्या कार्यामुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.. यावेळी नारायण ठोळे नितीन कांजूने अमोल सिरसाठ दिलीप पवार मोहसीन बागवान यांची उपस्थिती होती.