२८ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्यांची विषारी औषध घेवून आत्महत्या;-बहुलखेड्यातील खळबळ जनक घटना
छायाचित्रे ओळ-सुरेश पाटील आत्महत्या ग्रस्त शेतकरी
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव / प्रतिनिधी / शासन पातळीवर कर्जमाफीचा निर्णय होत नसतांना डोक्यावर कर्जाचा डोंगर असलेल्या २८ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची खळबळ जनक घटना शनिवारी रात्री अकरा वाजता तालुक्यातील बहुलखेडा येथे घडली
सुरेश अर्जुन पाटील (वय-२८) असे विषारी औषध घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे बहुलखेडा शिवारात त्यांची गट क्र-८० व गट-८२ शेती आहे गेल्या पाच दिवसापासून पावसाचा खंड असल्याने मका,कपाशी पिकांची खुंटलेली वाढ आणि त्यातच विविध रोगाचा विळखा यामुळे कर्ज फेडण्याच्या विवंचनेत सुरेश पाटील या २८ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले त्याच्यावर बँक आणि इतर खासगी असे एकूण सहा लाख इतके कर्ज आहे उत्पन्नाचे हमी नसल्याने कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन केले दरम्यान त्यास तातडीने उपचारासाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, त्यास वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येऊन रविवारी सकाळी अकरा वाजता शोकाकुल वातावरणात बहुलखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे बहुलखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन भाऊ,दोन मुले असा परिवार आहे.