छत्रपती कॉलनी येथील
वहिवाटीचा रस्ता बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा
सामाजिक कार्यकर्ता साद बिन मुबारक यांची मागणी..
जालना/प्रतिनीधी/ शहरातील छत्रपती कॉलनी येथील कुच्चर वटा ते जुना कदिम जालनाकडे जाणारा रस्त्याच्या बाजुला असलेले लोखंडी गेट बंद करून तेथे भिंत उभी करून सदर पुर्वापार चालत आलेला वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. संबंधीत रस्ता बंद केल्यामुळे या भागातून जुने तहसिल कार्यालय, रजिस्ट्री ऑफीस कडे जाणाऱ्या लोकांची तसेच नुतन विद्यालयात जाणारे विद्यार्थी, नुतन विद्यालयाचे वसतिगृह येथील विद्यार्थ्यांना देखील मोठी अडचण निर्माण झालेली आहे. या लोकांना जाणे येणे करण्यासाठी मुक्तेश्वर वेस ते कचेरी रोड मार्गे वळसा घालून यावे जावे लागते.त्यामुळे बंद करण्यात आलेला वहीवाटीचा रस्ता सुरु करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
महापालिका कार्यालयात अर्ज सादर करूनही सदर अर्जावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. या मनपा कार्यालयातील कार्यालयीन अधिक्षक, स्वच्छता निरिक्षक यांच्या लापरवाहीमुळे सदर प्रकार घडला आहे. कारण हे कोणतेही अर्हता प्राप्त नसून त्यामुळे ते जबाबदारीने कामे करीत नसल्याचे दिसून येत आहे. कार्यालयीन अधिक्षक देखील कोणताही सर्वे करीत नाही. या कार्यालयातील अधिकाऱ्यांना फोन द्वारे संपर्क केला तर हे अधिकारी स्थळावर जावून तेथील लोकांशी केवळ चर्चा करत आहेत. कोणतीही कार्यवाही करतांना दिसत नाहीत. तसेच हे लोक तोंडे पाहून काम करीत आहेत. एखाद्या गोर गरीब लोकाची प्रकरणे असली तर हे लोक त्वरीत कार्यवाही करून त्यांना हुसकावून लावतात. जसे त्यांनी मोती मस्जिद, नुतन वसाहत या व इतर अनेक भागात धडक कार्यवाही केलेली आहे. परंतु या रस्त्याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. शहरात स्वच्छता निरिक्षक हे अर्हताप्राप्त नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमाने होत आहेत. व त्यावर स्वच्छता निरिक्षक हे आर्थिक व्यवहार करून दर्लक्ष करीत असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अंधाधुंद कामे होत आहेत. आयुक्तांकडे अर्ज देवून देखील याकडे लक्ष दिल्या जात नाही. आम्ही माहिती अधिकारात माहिती मागवली असता त्यामध्ये देखील हा रस्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या कॉलनीतील कोणाही व्यक्तिला शासनाची कोणतीही परवानगी न घेता असा रस्ता अडविण्याचा कोणताही अधिकार नाही.
त्यामुळे रस्ता अडवणाऱ्या व्यक्ती विरुध्द फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुबारक यांनी केली आहे.