Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादराष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून बालगोपाळानी मोराचे वाचवले  प्राण

राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून बालगोपाळानी मोराचे वाचवले  प्राण

राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून बालगोपाळानी मोराचे वाचवले  प्राण
 शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीने  राष्ट्रीय पक्षी मोरोला दिले वनविभागाच्या ताब्यात
आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/प्रतिनिधी/ फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील शिवाजीनगर येथील वार्ड क्रमांक पाचमध्ये दि ,१३ जुलै रोजी सकाळी लोक वस्ती असलेल्या भागात राष्ट्रीय पक्षी असलेल्या एका मोराच्या मागे काही भटके कुत्रे लागले होते त्या कुत्र्याच्या तावडीतून लासुर स्टेशन येथील लाहन बालगोपालांनी त्या मोराला सोडवले व सुरक्षित शिल्लेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लासुर स्टेशन येथील पोलीस चौकीत त्या मोराला आणले  यावेळी कर्तव्यावर असलेले बिट अंमलदार विष्णू जाधव, गोपनीय शाखेचे योगेश हरणे,सुरेश भिसे यांनी त्या मोराला ताब्यात घेऊन तात्काळ वनविभागाचे कर्मचारी किसन गवळी यांना संपर्क साधून याबाबत कल्पना दिली वन विभागाचे कर्मचारी तात्काळ पोलीस चौकी येथे हजर झाले व शिल्लेगाव पोलिसांच्या मदतीने सदर ताब्यात घेऊन राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराचे प्राण वाचवल्याबद्दल बालगोपाळांचे आभार मानले. दरम्यान संजय अर्नाजलम,,टामगर ग्रुपचे अध्यक्ष  सुरेश साळुंके,एम. जी ग्रुपचे अध्यक्ष अनिकेत अर्नाजलम, राहुल जगधने, रीरेश डूबे,कुणाल वाघ,सौरभ रणयेवले, कार्तिक श्रीखंडे,मनोज पवार,राहुल जगधने,शरद जाधव, आनंद वरकड,पवन वरकड,सत्यम पवार, ओम लंके,अदित्य पवार आदींनी सदर मोराचे कुत्र्याच्या तावडीतून सोडून प्राण वाचवले त्याबद्दल लासूर स्टेशनसह पंचक्रोशीतील  वन्यप्रेमींनी सर्वांचे आभार मानले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments