बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक अकरा चे अध्यक्ष संतोष कासारे यांचे ”ममता” ळू मातृछत्र हरपले
बोरघर/माणगांव/ बौद्धजन पंचायत समिती तालुका माणगांव अंतर्गत शाखा क्रमांक अकरा चे विद्यमान अध्यक्ष तथा जे बी सावंत शिक्षण संस्थेचे चांदोरे हायस्कूल चे विद्यार्थी प्रिय अध्यापक संतोष बाबाजी कासारे व नालंदा बौद्धजन सेवा संघाचे सचिव, उत्तम कासारे आणि त्यांच्या भगिनी संगीता धोत्रे या तिन्ही भावंडांच्या मातोश्री ममता बाबाजी कासारे यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी रविवार दिनांक १३ जुलै २०२५ पहाटे ०१ : १५ वाजता त्यांच्या पेण तळे येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. दुपारी ०१ : ०० वाजता त्यांच्या पार्थिवावर पेण तळे येथील स्मशान भूमीत बौद्ध धम्माच्या रीतीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात त्यांचे दोन चिरंजीव एक विवाहित मुलगी,जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
दिवंगत मातोश्री ममता बाबाजी कासारे यांचा जल दान विधी, पुण्यानुमोदन, शोकसभा कार्यक्रम रविवार दिनांक २० जुलै २०२५ रोजी सकाळी ११: ०० वाजता त्यांच्या राहत्या घरी पेण तळे येथे बौद्ध धम्माच्या धम्म संस्कार विधी नुसार होणार आहे.
दिवंगत मातोश्री ममता बाबाजी कासारे यांचा स्वभाव अगदी त्यांच्या नावाप्रमाणेच अत्यंत ममताळू अर्थात प्रेमळ असा होता. त्यांना सामाजिक, धार्मिक कार्याची आवड होती. आपल्या बौद्ध वाडीतील आणि आपल्या पंचक्रोशीतील सुख दुःखाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या नेहमी आवर्जून उपस्थित असत. आपल्या घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीची त्या अत्यंत आत्मियतेने चौकशी करून त्यांच्या चहा, भाकरी आणि जेवणाची व्यवस्था करूनच सोडत असत. सर्वांशी प्रेमाने आणि वात्सल्याने वागणार्या या मातोश्रींच्या निधनाने कासारे परिवारासह पेण, बोरघर, आमडोशी आणि खरवली विभाग पंचक्रोशीत दुःखाची शोककळा पसरली असून संतोष बाबाजी कासारे, उत्तम बाबाजी कासारे, संगीता ताई धोत्रे यांचे मातृत्व हरपले आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांचे आप्तेष्ट, नातेवाईक, सगेसोयरे, नालंदा बौद्धजन सेवा संघ पेण चे स्थानिक व मुंबई भावकीचे आजी माजी पदाधिकारी, जे बी सावंत शिक्षण संस्थेचे अद्यापक वृंद, बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगांव चे विद्यमान अध्यक्ष रविंद्र मोरे, सचिव आर डी साळवी, जेष्ठ विधिज्ञ एडव्होकेट नरेश जाघव, रणजित मोहिते व आजी माजी पदाधिकारी, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाच खरवली विभाग शाखेचे माजी अध्यक्ष गणेश मोहिते, माजी उपसचिव पत्रकार विश्वास गायकवाड, विद्यमान अध्यक्ष विवेक जाधव, उपाध्यक्ष राजेश कासारे, सचिव अमोल मोहिते, मा. सचिव तथा विस्तार अधिकारी नारायण जाधव, संघटक पराग, जाधव, नितीन जाधव व आजी माजी पदाधिकारी, खरवली ग्रामपंचायत सदस्य योगेश शिर्के, बोरघर बौद्धजन सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष जनार्दन गायकवाड, मुंबई अध्यक्ष एकनाथ गायकवाड, सचिव बाळकृष्ण जाधव, रमेश गायकवाड, सखाराम गायकवाड, तेजस गायकवाड, योगेश गायकवाड, गौतम गायकवाड, रमेश घोगरे, एडव्होकेट राकेश मोरे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे सुर्यकांत कासे सर, बामसेफ चे दिपक मोरे, माजी ना. तहसीलदार शिवाजीराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते संतोष मोरे, प्रमोद मोरे, बागवे, तळा तालुका भारतीय बौद्ध महासभा सुरेंद्र शेलार, बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभेचे आजी माजी पदाधिकारी, सामाजिक धार्मिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.