Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादबुद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी समाजाची आहे अनिल साबळे यांचे प्रतिपादन

बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी समाजाची आहे अनिल साबळे यांचे प्रतिपादन

बुद्ध धम्म प्रचार आणि प्रसाराची जबाबदारी समाजाची आहे
अनिल साबळे यांचे प्रतिपादन
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/
बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे धम्माचे विचार घराघरांमध्ये पोहोचवणे
आदर्श संस्कार क्षम उपासक उपसिका निर्माण करणे प्रज्ञाशील करुणा चारित्र्य नीतिमत्ता मंगल मैत्री यावर आधारित बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला समाज निर्माण करणे ही जबाबदारी महामानव तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचारांवर कार्यावर श्रद्धा असणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाची आहे.
ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्यास समाज आदर्श वत होण्यास वेळ लागणार नाही.
अशा प्रकारचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ संभाजीनगर चे अध्यक्ष अनिल साबणे यांनी केले.
बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी आषाढी पौर्णिमा बुद्ध धम्म सुसंस्कार पर्व वर्षावास प्रारंभ निमित्ताने १० जुलै २०२५ रोजी कार्यक्रमाचे आयोजन बुद्ध विहार पूर्णा या ठिकाणी अखिल भारतीय भक्कम संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो ,भदंत पयावंश यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी भदंतशील रत्न थेरो भंते पयासार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख पाहुणे म्हणून पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे, देवगिरी प्रतिष्ठान लातूरचे अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राजू एडके जालना येथील ज्येष्ठ धम्म उपासक कैलास खरात आदींची उपस्थिती होती.
डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समितीच्या वतीने मान्यवरांचा शाल पुष्पहार सन्मान चिन्ह व लिंबूनी स्मरणिका देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी बुद्धकालीन वर्षावासाचे महत्त्व व आतापर्यंत चालत आलेली ती परंपरा याविषयी ऐतिहासिक संदर्भात माहिती विशद केली.
आपल्या मनोगत असे म्हणाले माझा हा ४४ वा वर्षावास व बुद्ध विहारातून तयार झालेले माझे शिष्य पय्या वंश यांचा हा प्रथम वर्षावास
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचा कालखंड
या कालखंडामध्ये बुद्ध धम्मा मध्ये असलेली प्रज्ञाशील करूणा मंगल मैत्री व धम्मामध्ये असलेले मानवतेची शिकवण काया वाच्या मनाने आचरणात आणली पाहिजे.
अशा प्रकारचा हितोपदेश त्यांनी धम्मदेशनेमध्ये दिला.
या कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रकाश कांबळे यांचा वाढदिवसानिमित्त बुद्ध विहार समितीच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात स्मृतीशेस  लक्ष्मीबाई ग्यानोजी जोंधळे यांच्या स्मरणार्थ उपासिका वैशाली विजय जोंधळे यांच्याकडून उपस्थितांना खिर् दान करण्यात आले.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर यशवंत उबारे माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम नगरपालिकेचे गटनेतील उत्तम भैया खंदारे ज्येष्ठ नगरसेवक अनिल खर्ग खराटे एडवोकेट धम्मदीप जोंधळे एडवोकेट हर्षवर्धन गायकवाड ज्येष्ठ पत्रकार जगदीश जोगदंड विजय बगाटे डॉक्टर अशोक जोंधळे शामराव जोगदंड विजय जोंधळे दिलीप गायकवाड इंजिनीयर पीजी रणवीर अमृतराव मोरे टी झेड कांबळे वारा काळे शिवाजी  थोरात आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी अमृत  कऱ्हाळे राम भालेराव बाळू बरबडीकर राजू जोंधळे सुमेध काळे आदींनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments