प्रति, माननीय संपादकजी,
विषय:-युवा वर्गामध्ये ह्रदयविकारांचा वाढता आजार चिंताजनक!
पुर्वी ह्रदयविकाराचे आजार (हार्डअटॅक) याबाबत एक वयोमर्यादा होती साधारणतः वयाच्या ६० वर्षांनंतर या आजारांचे प्रमाण जास्त रहायचे.परंतु गेल्या काही वर्षांत ३० ते ५० वर्षे वयोगटामध्ये ह्रुदयविकाराच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कारण गेल्या काही वर्षांमध्ये प्रत्येक व्यक्तींची रहानिमानाची,खानपानाची,मादक द्रव्ये व अन्य व्यसन यामुळे दिनचर्येच्या शैलीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलाव आल्याचे दिसून येते.पंजाब मधील फिरोजपुर मधील गुरूहर सहाय या मैदानावर दिनांक २९ जून २०२५ रविवारला हरजीत सिंह नामक युवा क्रिकेट खेळाडू बैटींग करतांना छक्का मारला व अचानक हार्ट अटैक आला व तो तिथेच पडला आणि त्याचा मृत्यू झाला ही धक्कादायक बाब आहे.यामुळे सर्वांचेच ह्रदय हळूहळून आले व खेळाडूंमध्ये शोककळा पसरली.यापुर्वीही मुंबईमध्ये जून २०२४ मध्ये क्रिकेट मैचच्या दरम्यान राम गणेश तेवर नामक खेळाडूने छक्का मारल्या बरोबर ह्रुदयविकाराचा झटका आला व क्रिकेट खेळतांना अशीच ह्रदयद्रावक घटना घडली व या ४२ वर्षीय या खेळाडूचा मृत्यू झाला.२०२४ मध्ये अशाप्रकारे पुणे येथील गरवारे स्टेडियममध्ये इमरान पटेल नामक खेळाडू ३५ वर्षीय क्रिकेट मैच खेळताना ह्रुदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.यावरून स्पष्ट होते की अटैकचे (ह्रदयविकाराच्या आजारांचे) प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे.ह्रदयविकाराच्या मृत्यूचे अनेक कारणे असू शकतात मादक द्रव्ये सेवन करणे, धुम्रपान, तंबाखू, गुटका,मद्य सेवन यांचाही हृदयविकारावर मोठ्या प्रमाणात गंभीर परिणाम होतो व पुढे चालून मृत्यूचे कारण बनत असते.त्याचप्रणाणे मोबाईलचा जास्त प्रमाणात वापर, वाढता तनाव,अनियमित जीवनशैली, दिनचर्येत फास्ट फूडचे वाढते प्रमाण,आहाराची ढासळती गुणवत्ता,वेळोवेळी आरोग्याची काळजी न घेणे व व्यायामाचे कमी प्रमाण,वाढते लठ्ठपणा,इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम युवावर्गामध्ये होत असल्याने ह्रदयविकाराच्या आजारांचाधोका वाढतो आहे. युवावर्गामध्ये ह्रदयविकाराच्या आजारांमध्ये भर टाकली(बीपी व शुगर)डायबिटीजने हाई ब्लड शुगरचा सरळ प्रभाव ह्रदयविकाराच्या आजारांवर होतो.या आजारांचे मुख्य कारण म्हणजे मसालेदार पदार्थ,ऑयली फूड,फास्ट फूड,अती कोल्ड्रिंक्स घेणे आणि मिठाई यामुळे डायबिटीजचे प्रमाण वाढुन सरळ ह्रदयविकारांचे आजार होत आहे किंवा होवू शकतात.सोबतच सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे व वाढत्या प्रदूषणामुळे सुध्दा ह्रदयविकाराचे आजार दिसून येतात.आपण पाहिले की सध्याच्या परिस्थितीत अनेक अभिनेता,गायक, हास्य कलाकार आणि निर्देशक याचा ह्रदयविकाराच्या आजारांनी मृत्यू झाल्याचे आपण पाहिले.यात वयोमर्यादा ३०,४०,५० वर्षे अशा प्रमाणे कमी वयोमर्यादा आहे.या वयात हृदयविकाराच्या आजारांने मृत्यू (हार्डअटॅक) होत असेल तर ही बाब अत्यंत चिंताजनक, गंभीर व धक्कादायक आहे.त्यामुळे वाढते ह्रदयविकारांचे आजार किंवा अन्य आजार पहाता सर्वांनीच आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.
लेखक
रमेश कृष्णराव लांजेवार
