छत्रपती संभाजीनगर/प्रतिनीधी/ श्री खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्वनाथ मंदिर
राजा बाजार येथे प.पु. आचार्य प्रनाम सागरजी महाराज यांचा २०२५ चा
चार्तुमास महोत्सव सुरू असूण त्याच्या सानिध्यात आज गुरू पौर्णिमा महोत्सवाचे
आयोजन श्री हिराचंद कासलीवाल प्रागण येथील आचार्य गुप्तीनंदजी
सभागृहात करण्यात आले होते. सर्व प्रथम सकाळी मंदिरात भगवताचा पंंचामृत
अभिशेक संपन्न होऊन नित्य नियम पुजा करण्यता आली.
तदनंतर दुपारी राजा बाजार जैन मंदिर येथुन आचार्य श्री च्या सानिध्यात भव्य
शोभा यात्रा काढण्यात आली. ही शोभा यात्रा श्री कासलीवाल प्रांगणात विसर्जीत
करण्यत आली.
तदनंतर तेथे कार्यक्रमाचे प्रास्तावीक पंचायत चे अध्यक्ष महावीर पाटणी यांनी केले.
तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिव प्रकाश अजमेरा यांनी केले
कार्यक्रमाची सुरूवात सपना पापडीवाल व मनिषा पाटणी यांच्या मंगला चरणाने
करण्यात आली. तसेच उपस्थित प्रमुख अतिथी व बहुमंडळाच्या सदस्याच्या
हस्ते दिप प्रज्वलन करूण कार्यक्रमास सुरूवात करणत आली तसेच यावेळी
शांतीनाथ भगवंताच्या व आचार्य पुष्पदंत महाराजांच्या फोटोला पुष्प अर्पण
करण्यात आले. यावेळी छ. संभाजीनगर शहराचे विभागीय आयुक्त श्री जितेंद्र
पापळकर यांनी सह पत्नीक उपस्थित राहुण आचार्य यांचे दर्शन घेतले.
त्यांचा पंचायतच्या वतीने शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देवून यथोचित सन्मान
करण्यात आला. तदनंतर लोणी येथल रहिवासी वर्धमान रिखबचंद पाटणी यांच्या
परिवारांच्या वतीने आचार्य श्रीचे पाद पक्षालन करणत आले. तसेच आचार्य
श्रीनां विजयकुमार, जितेंद्रकुमार, नितिनकुमार, नविनकुमार, पाटणी परिवार
विजय टायरवाले यांच्या वतिने शास्त्र प्रदाण करण्यात आले. तदनंतर सर्व
उपस्थित समाज बांधवांना अजित, डॉ. प्रकाश, श्रीपाल, पवण, राजेश, संजय,
मुकेश, विजय, पापडीवाल परिवार यांच्या वतिने महाप्रसाद देण्यात आला.
तसेच गुरूपौर्णिमेचे औचित्य साधुन मंदिराचे विश्वस्त किरणकुमार, दिपककुमार,
चंद्रशेखर, रविकुमार, सुरज, पहाडे परिवार यांच्यावतीने भगवान शांतिनाथाच्या
चरणी चांदिचे छत्र अर्पण करण्यात आले. तर पार्श्ननाथ भगवताला छत्र अर्पन करन्याचे सौभाग्य विजय गनेशलाल कासलीवाल याना मिळाला तर चवर चढवयाचे सौभाग्य तरूण यूवा मच याना मिळाला तर शांतीनाथ भगवानताचा सिहासन चे सौभाग्य शोभाबाई बाकलीवाल याना मिळाला
तसेच यावेळी आर्चाय पुष्पदंत सागरजी महाराज, गणाधीपती गनाधराचार्य कुंथुसागर महाराज,
पुलक सागरजी, विभव सागरजी, प्रसन सागरजी, चंद्रगुप्तजी, देवनंदजी,
गुप्तीनंदजी, सुविधीसागरजी, विशुध्दसागरजी, सौभाग्य सागरजी, सुयस गुप्तजी,
अजय सागरजी महाराज, सौभाग्यसागरजी महाराज, आयीका ज्ञानमाताजी, विशाश्री माताजी,
सौभाग्यमती माताजी, आदी पुर्वज साधु संताच्या पादुकेचे दुध व केशरणे प्रथमच पाद पक्षालन
करणत आले. यावेळी शहरातील विविध विभागातील बहुमंडळाच्या सदस्यानी वेगवेगळया
वेशभुषा सादर करूण आचार्य श्रीच्या चरणी आष्टद्वव्याची पुजा सादर केली.
यावेळी आचार्य उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करणतांना सागीतले की.परमेश्श्वराच्या चरणी व गुरू चरणामध्ये नतमस्तक झाल्याने तुमच्यातील अहंकार विसर्जीत होत असतो. अहंकार व्रâोधाला जन्म देतो तर विनय व शांतता हि समतेला विचार पुर्वक न केलेले कार्य हे नेहमी दुखदायी असते. विनयाने ज्ञान,धन,यश,समता,शांती आदींची संपन्नता होत असते. विनयच तुमच्या प्रगतीचे कारण आहे. या करिता तुम्ही नेहमी गुरâ संत, आई वडिल व कुटुंबात विनयाने वागा तुमचे जीवन बहरल्या शिवाय राहणार नाही असे मौलीक विचार आचार्य श्री काढले पुढे आपल्या सुमधुन वाणी ने आचार्य श्री म्हणाले की, मनुष्याने स्वतहामध्ये विनयाचे भाव आणले पाहिजे. विनयाने मुक्ती मिळते, आदर मिळतो, विदया विकास होतो. विनयामुळे मोठा शत्रुही तुमचा मित्र होवु शकतो. आचरण व विनय संपन्न असलेला व्यक्तीच हा खरा श्रावक आहे. या करिता नेहमी दुस-याचा आदर करा असे ही त्यांनी शेवटी सांगीतले
यावेळी पंचायत अध्यक्ष महावीर पाटणी सचिव प्रकाश अजमेरा, चातुर्मास
कमिटचे अध्यक्ष
अॅड. अनिल कासलीवाल, किरण पहाडे, महाविर ठोळे, जितेंद्र पाटणी, संतोष सेठी, चदा कासलीवाल
, नीता ठोळे, यतीन ठोळे, यांच्या सह प्रमोद पाडे अशोक गगवाल अनुप पाटणी रवी सेठी कीरन गगवाल विपीन पाडे प्रमोद पाटनी
शांतीलाल पाटणी, संजय पहाडे, आदीनी परीश्रम घेतले अशी माहिती नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल
उद्या दिनांक १२ जुलै रोजी श्री हिराकाका प्रांगण येथे आयार्चा डॉ. प्रणाम सागर महाराज
यांच्या सानिध्यात चार्तुमास कळसाची विधिवत स्थापना दुपारी १ वाजता
करण्यात येणार असूण यावेळी आचार्य श्रीचे पाद प्रशालन पुजा प्रवचण असे
विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.