ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा जालना जिल्हा दौरा
जालना/ कै. वसंतराव नाईक शेती स्वावंलबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील राज्यमंत्री दर्जा हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
शुक्रवार दि. 11 जुलै 2025 रोजी दुपारी 3.00 वाजता विश्राम भवन जालना येथे आगमन. दुपारी 4.00 वाजता मग्रारोहयो अंतर्गत शासकीय गायरान जमिनीवर चारा लागवडी संबंधी उपजिल्हाधिकारी (रोहयो) व तहसिलदार जालना यांनी सुचविलेल्या प्रस्तावीत चारा लागवडीच्या ठिकाणास भेट व पाहणी . सायंकाळी 6.00 वाजता सोईनुसार अमरावती मार्गे काटोलकडे प्रयाण करतील.
