कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पदावर अमोल बोरकर रुजू
जालना/ शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे आयुक्त यांच्या आदेशान्वये सेवाज्येष्ठतेनुसार अमोल बोरकर यांची कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी पदी पदोन्नतीने जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे.
कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अमोल बोरकर यांनी जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात हजर होवून बुधवार दि.9 जुलै 2025 रोजी मध्यान्ह पुर्व कर्तव्यावर रुजु झाले आहेत. यापुर्वी त्यांनी नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे आपली सेवा निष्ठेने व जबाबदारीने पार पाडलेली आहे. त्यांच्या पदोन्नतीबद्दल अधिकारी-कर्मचारी, मित्र परिवार आणि नातेवाईक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.