पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागातील
मत्स्यव्यावसायिकांचा शनिवारी सन्मान सोहळा
पुणे, दि. ७ : राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून केंद्र व राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विषयक विविध योजनांची जनजागृती कार्यक्रम आणि पुणे व छत्रपती संभाजीनगर द्विविभागस्तरीय मत्स्यव्यावसायिकांचा सन्मान सोहळा शनिवार, १२ जुलै २०२५ रोजी पुण्यातील कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आला आहे.
मत्स्यव्यवसाय क्षेत्रामध्ये मत्स्यबीज उत्पादन, मासेमारी, मत्स्यशेती, केज कल्चर, बायोफ्लॉक कल्चर, शोभिवंत मत्स्यव्यवसाय, मत्स्यखाद्य, शितसाखळी, विपणन, नाविन्यपूर्ण मत्स्यउद्योजक, रिव्हर रँन्चिग, मत्स्यपर्यटन, सहकार, सामाजिक, प्रचार-प्रसार या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी, व्यक्ती, संस्था, कंपन्या आदींना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमात विविध योजनांबरोबरच मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा मिळाल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याने जास्तीत जास्त मत्स्यव्यवसायिकांनी कार्यक्रमात सहभाग घ्यावा. अधिक माहितीसाठी ८७८८०९१६४९ व ९६६५६३२७९३ या क्रमाकांवर संपर्क साधवा, असे आवाहन पुणे व छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रादेशिक उपआयुक्त विजय शिखरे यांनी केले आहे.
