फुलंब्री शहरातील हजरत जमाल शहा बाबा दर्गहा रोड फुटला, सर्व सामान्य वाहनधारकांंना नाहक त्रास
आत्ताच एक्स्प्रेस
फुलंब्री/प्रतिनिधी/ फुलंब्री शहरातील मच्छी बाजार कडील हजरत जमाल शहा बाबा दर्गहा रोड फुटल्याने सर्व सामान्य वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मच्छी बाजार परिसर व मंगळवारच्या आठवडी बाजार परिसरातुन जाणारा मुख्य रस्ता फुटला आहे.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व फुलंब्री नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. हजरत जमाल शहा बाबा दर्गहा रोड वरुन बाबरा कान्होरी नाचणवेल कडे रस्ता जातो.
तसेच या फुलंब्री शहराचा आठवडी मंगळवारी भरतो, ग्रामीण भागातुन येणारे व्यापारी , शेतकरी व नागरिकांना या खराब रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस सुरू आहे, पावसाचे पाणी रस्त्यावर तुंबत आहे, तसेच चिखल होत आहे, या चिखलातुन पायी चालने मुश्किल झाले आहे.
औरंगाबाद जळगाव रोड पासुन हजरत जमाल शहा बाबा दर्गहा परिसरा पर्यंत रस्त्यांची दयानिय अवस्था झाली आहे.
या रस्त्यांची दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी लक्ष द्यावे. रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी फुलंब्री शहरातील नागरिक करत आहे.