साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीच्या
अध्यक्षपदी रवि पांडव तर सचिवपदी विनोद आठवे
जालना/प्रतिनिधी/ सत्यशोधक साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त शासकीय विश्रामगृह येथे रविवार दि. 6 रोजी सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. या बैठकीस सर्व समाज बांधव आणि विविध पक्षातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
सदरील बैठक विष्णूआबा गवळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यामध्ये सर्वानुमते जयंती समितीच्या अध्यक्षपदी रवि पांडव, सचिव विनोद आठवे, उपाध्यक्ष विकी गवळी यांची निवड करण्यात आली.
यावेळी बैठकीस ज्येष्ठ नेते गोविंदराव बोराडे, संजूबाबा गायकवाड, कृष्णा पांडव, प्रभाकर घेवदे, सुरेश कांबळे, रविराज पाखरे, सचिन लोंढे, किशोर कांबळे, आकाश रणपिसे, सुनील कासार, गणेश पांडव, श्याम सराटे, प्रकाश भोसले, राम हिवाळे, विलास आठवे, साहेबराव कांबळे, सचिन कांबळे, कृष्णा भालेराव, सुनील साठे, परमेश्वर कांबळे, नितीन हिवाळे, कुलदीप जगधने, सुहास कांबळे, कुणाल रनपिसे आदींसह समाज बांधवांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
