Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी
जालना – थोर राष्ट्रनेते आणि भारतीय विचारवंत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची १२५ वी जयंती आज जालना येथे उत्साहात साजरी करण्यात आली. माय भारत, जालना व राष्ट्रमाता अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता अकॅडमी, जालना येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ. सोमीनाथ खाडे जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना,  अनिलकुमार धारे STI, श्रीमती चंदाताई धारे संस्थापीक अध्यक्षिका राष्ट्रमाता अकॅडमी व वैभव पिसे उपस्थित होते.
श्री. अनिलकुमार धारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. मुखर्जी यांचे राष्ट्रहितासाठीचे योगदान उलगडून दाखवले. प्रमुख मार्गदर्शक  डॉ. सोमीनाथ खाडे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी डॉ. मुखर्जी यांचे बलिदान आणि विचार तरुण पिढीने आत्मसात करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी जयपाल राठोड अध्यक्ष, युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments