Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादविप्र फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जयप्रकाश  श्रीमाली तर सचिवपदी विजयकुमार व्यास

विप्र फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जयप्रकाश  श्रीमाली तर सचिवपदी विजयकुमार व्यास

विप्र फाउंडेशनच्या अध्यक्षपदी जयप्रकाश 
श्रीमाली तर सचिवपदी विजयकुमार व्यास
जालना/प्रतिनिधी/ विप्र फाउंडेशन जालना शाखेची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून, अध्यक्षपदी जयप्रकाश श्रीमाली, सचिवपदी विजयकुमार व्यास, कोषाध्यक्षपदी ललित बिजावत यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणीचे पदग्रहण व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शनिवार दि. 5 जुलै रोजी जेईएस महाविद्यालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये उत्साहात पार पडला.
      या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून जेईएस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री तर प्रमुख पाहुणे म्हणून विप्र फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए आर. बी. शर्मा, छत्रपती संभाजीनगर झोनचे कोषाध्यक्ष  उद्योजक किशोर उपाध्याय तर व्यासपीठावर मावळते अध्यक्ष रामनिवास गौड, सचिव पवन जोशी, कोषाध्यक्ष नारायण दायमा, आशीर्वाद देण्यासाठी भागवताचार्य आचार्य सत्यनारायणजी व्यास, रामायणाचार्य प. पू. मनोज महाराज गौड यांची उपस्थिती होती.
      अध्यक्ष भाषणात सीए आर. बी. शर्मा म्हणाले की, झोन 12 सी मध्ये 15 जिल्ह्यांचा समावेश असून रामनिवास गौड यांच्या नेतृत्वाखालील जालना शाखेचे कार्य सर्वोत्कृष्ट राहिलेले असून, नूतन कार्यकारिणीने हा वसा कायम ठेवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकपर भाषणात मावळते अध्यक्ष रामनिवास गौड यांनी गेल्या वर्षभरातील कार्यकाळाचा आलेख मांडताना सर्वांच्या सहकार्याने सर्व क्षेत्रात अनेक उपक्रम राबविता आले, असे सांगून नूतन कार्यकारणीला सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहकार्य करू, असे सांगितले.
         याप्रसंगी नूतन कार्यकारिणीचे अध्यक्ष जयप्रकाशजी श्रीमाली, सचिव पं. विजय व्यास, कोषाध्यक्ष ललित बिजावत, उपाध्यक्ष मनोज दायमा, कैलाश खंडेलवाल, उमेश पंचरिया, संजय सारस्वत, रामेश्वर जोशी, अशोक शर्मा, सहसचिव चंद्रप्रकाश श्रीमाली, दीपेश व्यास, सहकोषाध्यक्ष प्रवीण शर्मा, सल्लागार आचार्य सत्यनारायणजी व्यास, मनोज महाराज गौड, संगठन मंत्री रवींद्र अबोटी, दिलीप गौड, शिक्षणमंत्री भगवानदास दायमा,  विजयकुमार शर्मा, आरोग्यमंत्री डॉ. नितीन खंडेलवाल, डॉ. गोविंद सारस्वत, क्रीडामंत्री रामकुवर श्रीमाली, दुर्गेश दायमा, प्रसिद्धीमंत्री महेश खंडेलवाल, जितेंद्र ओझा, जनसंपर्क मंत्री सुरेश शर्मा, नारायण दायमा, कार्यकारणी  सदस्य मुरारीलाल सारस्वत, जुगलकिशोर श्रोत्रीय, बंकटलाल खंडेलवाल, ओमप्रकाश दायमा, किशोर शर्मा, सतीश शर्मा, डुंगरसिंग राजपुरोहित, सुरेश उपाध्याय यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडला. यानंतर विप्र समाजातील दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
         यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर आभार सचिव विजयकुमार व्यास यांनी मानले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments