Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादआषाढी एकादशीनिमित्त बालविकास शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखीसह दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त बालविकास शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखीसह दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त बालविकास शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखीसह दिंडी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या निनादाने शालेय परिसर बनला विठ्ठलमय
जालना/प्रतिनिधी/ कसबा येथील महिला मंडळ जुना जालना संचलित श्रीमती प्रभावतीबाई कोळेश्वर बालविकास प्राथमिक शाळेच्यावतीने दि. 5 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त पालखीसह दिंडी काढण्यात आली.
         शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी व आकर्षक पोशाख परिधान केले होते, या दिंडीत बालवाडी ते सातवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! या नादाने शालेय परिसर विठ्ठलमय झाला होता.  शाळेपासून  कसबा, माळीपुरा, गांधी चमन या परिसरातून ही दिंडी पुन्हा शाळेत परतली. यानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता परदेशी यांनी दिंडीचे महत्त्व विशद केले.  यावेळी  महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सीमाताई देशपांडे, सचिव सौ. विद्याताई कुलकर्णी, कोषाध्यक्ष सौ. सुनंदाताई बदनापूरकर, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments