Wednesday, October 29, 2025
Homeऔरंगाबादबोरगाव अर्ज येथे हुतात्मा सांडुजी वाघ यांचा  जन्मोत्सव थाटात साजरा 

बोरगाव अर्ज येथे हुतात्मा सांडुजी वाघ यांचा  जन्मोत्सव थाटात साजरा 

बोरगाव अर्ज येथे हुतात्मा सांडुजी वाघ यांचा  जन्मोत्सव थाटात साजरा 
१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांचा गुणवंत रत्न पुरस्कार देऊन सत्कार
 आत्ताच एक्स्प्रेस
फुलंब्री/प्रतिनिधी/  मराठवाडा मुक्ती संग्रामात निजामाचा कर्दनकाळ बनलेल्या हुतात्मा साडू सखाराम वाघ यांच्या जन्मोत्सव निमित्त  ५ जुलै रोजी बोरगाव अर्ज तालुका फुलंब्री येथे जन्म उत्सव सोहळा अभिवादन व समाजातील १० वी व १२ वी  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ‘ गुणवंत रत्न पुरस्कार २०२५ देऊन सत्कार करण्यात आला .
 मराठवाड्यात रजाकाराच्या अन्याय ,अत्याचार , जुलमातुन व हैद्राबाद स्टेटच्या जोखाड्यातुन मराठवाडा स्वतंत्र होऊन येथील मराठी माणुस स्वाभिमानाने, अभिमानाने, व्यवहारीक जिवनातुन मुक्त पणे जिवन जगावं या साठी बलिदान दिलेले नाभिक पुत्र हुतात्मा सांडुजी सखारामजी वाघ यांचा  जन्म दिनांक ५ जुलै १९१८ रोजी बोरगाव अर्ज येथे झाला होता . फुलंब्री तालुक्यात  बोरगाव अर्ज  येथे मोठ्या वास्तुसह गावाच्या वेशी जवळ समाधी  मुख्यमंत्री ए आर अंतुले यांनी १९८२ या काळात बनवुन ठेवलेली आहे.
 समाजात रत्न जन्माला येऊन महान कार्य करुन समाजाचे नावलौकिक केलेत समाजाने याची आठवण ठेवत महान हुतात्म्यांचे जन्म उत्सव समाजाच्या वतीने जन्म ५ जुलै २०२५ वार शनिवार रोजी सकाळी ११  वाजता बोरगांव अर्ज येथे  साजरा करण्यात आला.या ठिकाणी १० वी १२ वी  समाजातील गुणवंत विध्यार्थी – विध्यार्थ्यांनी यांना गुणवंत रत्न पुरस्कर  देऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन  सत्कार करण्यात आला आला .  कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच शिवाजी खरात व प्रमुख अतिथी कल्याणराव चव्हाण , शिवाजी पाथ्रीकर , गाडेकर यासह वडोद बाजार पोलीस ठाण्याचे  पो उप निरीक्षक प्रशांत क्षिरसागर , कचरू जाधव , प्रा राजकुमार गाजरे , विष्णु वखरे , दिलीप गवळी , संतोष बोराडे वंदना वाघ पंढरिनाथ काळे  हे होते .
यावेळी १० वी इय्यतेची विद्यार्थीनी कुमारी भाग्यश्री विजय पांडव ( प्रथम ) , कु वैष्णवी रामेश्वर सवणे ( द्वितीय ) कु साक्षी संतोष बोर्डे (  तृतीय ) या सह उतेजनार्थ यश संदीप बोर्डे व ओम दतात्रय पंडीत यांचा तर १२ वी इयत्तेतील गुणवंत विद्यार्थी कुमारी प्राणजंली अमोल वाघ ( प्रथम ) कु प्रगती दत्तु घोडके ( द्वितीय ) कु स्वामीनी गणेश भुसारे ( तृतीय ) व उतेजनार्थ कु . गितांजली संतोष बोर्डे , अदित्य शिवाजी वाघ , भुषण बाबुराव वाघ , विद्या दिलीप वाघ , श्रद्धा कैलास वाघ , यांना स्मृती चिन्ह गौरव पत्र पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी राजु बलांडे , सोनाजी साळवे , गणेश वैद्य , रामेश्वर सवणे, सुनिल वैद्य , संतोष वाघ , गणेश वखरे , सुनिल बिडवे , मुंजाबा भाले , महादेव भाले , दादासाहेब काळे , शरद पंडीत , संजय पंडीत , गणेश बोर्डे , शिवाजी वाघ , मधुकर वाघ , पंढरीनाथ वाघ , कैलास वाघ , राधाकिसन वाघ , गजानन बिडवे , नारायण वाघ कैलास वाघ , गणेश वाघ यांच्यासह अनेक समाज बांधवांची यावेळी अनेकांची उपस्थिती होती . सुत्र संचलन सुरेश बोर्डे यांनी तर आभार दिलीप गवळी यांनी व्यक्त केले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments