सोयगाव/प्रतिनिधी/ विजय पगारे अनेक वर्षांपासून खरेदी विक्री संघा मध्ये प्रशासन नेमणूक होती त्यामुळे अनेक कामे ही ठप्प झाली होती.अनेक दिवसाची प्रतीक्षा सपत रविवारी दि (२८)रोजी तालुक्यातील तीन मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यामुळे सोमवारी सकाळ पासुन सर्व पक्षाच्या कार्यकर्ते मध्ये मोठा उत्सव होता मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार ,अजित पवार, गट)यांच्या पक्षाचे खाते ही उखडले नाही मात्र ठाकरे गटाचे सहा पैकी सहा उमेदवार विजयी करीत शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांच्या करिश्मा कायम ठेवत सहा पैकी सहा जागा विजयी करीत नवनिर्वाचित वर्चस्व कायम ठेवले आहे बनोटी गोंदेगाव गटातून ठाकरे सेनेचे तीन उमेदवार तब्बल ४०० मताच्या फरकाने विजयी झालेल्या आहे .
आमदार अब्दुल सत्तारला शहरातून भाजपाचा धक्का.
सोयगाव मतदारसंघातील वैयक्तिक मतदार संघत शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उमेदवारांना मोठा धक्का देत भारतीय जनता पक्षाचे तीन उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांना हा एक मोठा धक्का माणला जात आहे.
खरेदी विक्री संघातील विजयी उमेदवार पुढील प्रमाणे.
सोयगाव वैयक्तिक मतदार संघ.१ मयुर मनगटे विजयी (३४२)२,सोहणी मंगेश सुभाष विजयी(३२२)३,पाटील सुनील अरुण विजयी(३०९)
वैयक्तिक मतदार संघ बनोटी,१,निकम  संजय काशीनाथ विजयी ठाकरेगट (६३३)२,बोरसे सुभाष अजबराव विजयी ठाकरे गट (६२९)३,वेहळे मुरलीधर चिंतामण विजयी ठाकरे गट(६०२).
वैयक्तिक मतदार संघ फर्दापुर विजयी,१,जाधव राधेशाम जगन्नाथ विजयी (२४३)२,वराडे रंगनाथ रामदास विजयी(२४९)३,बावस्कर समाधान बाबुराव(२३२)
अनुसूचित जाती/अनुचित जमाती मतदार संघ विजयी१,तायडे भरत बाबुराव(१२८०)
महिला प्रतिनिधी मतदार संघ,विजयी१,राजपूत चंदाबाई शिवदास(१२९६) २,सोळंके प्रतिभा धरमसिंग विजयी ठाकरे गट (१२३४).
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी मतदार संघ विजयी१,तेली मोतीराम नारायण(१३८६).
विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाप्र मतदार संघ विजयी.१,राठोड राजेंद्र पेलाद विजयी ठाकरे गट(१२९०).
सहकारी संस्था फर्दापुर विजयी१,पवार गुलाबसिंग देवसिंग(६).
सहकारी संस्था सोयगाव विजयी१,काळे प्रभाकर दयाळराव विजयी(११).
सहकारी संस्था बनोटी विजयी बिनविरोध ठाकरे गटाचे ,लहाणे भगवान कैतिक..
वरील प्रमाणे नवनिर्वाचित सदस्य म्हणून निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. यांच्या सोबत निवडणूक निकाल प्रक्रिया पार करण्यासाठी सहकार क्षेत्रातील अधिकारी दिलीप रावणे,कुभार,युवराज काळे,भिमसेन पाटील अशोक वाघ,अशोक पाटील, घुगे,यांच्या सह अनेक अधिकारी सहभागी झाले होते, कोणताही अनुसूचित प्रकार घडु नाही म्हणून सोयगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवार,पी एस आय गजानन आरेकर,रज्जाक शेख,यांच्या सह पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
फोटोओळ. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख किंगमेकर राजेंद्र राठोड ची भुमिका घेत आपले सहा पैकी सहा उमेदवार विजयी होताच  गुलालाची उधळण करताना.