औरंगाबाद- जुना बाजार येथील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये इंडिया पोस्ट फोरमची बैठक संपन्न झालेली आहे.
सीनियर पोस्ट मास्टर सुरेश बनसोडे यांच्या अध्यक्षखाली बैठक पार पडलेली असून यावेळी विविध कामाचा आढावा घेतलेला आहे तसेच नवीन कामाच्या सूचना सर्व सदस्याने दिलेली आहे.
मागच्या मार्चमध्ये झालेल्या फोरमची बैठक मध्ये काही सूचनांना मांडण्यात आल्या होत्या या सूचनांना मंजुरी मिळालेली असून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. असे यावेळी सीनियर पोस्ट मास्टर सुरेश बनसोडे यांनी सांगितलेले आहे.
मागच्या मार्चमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सदस्य अब्दुल कयूम यांनी खेळाबाबत सूचना मांडल्या होत्या लवकरच पोस्टमध्ये असलेल्या ओपन स्पेस मध्ये गट्टू बसविल्यानंतर पोस्टाच्या कर्मचाऱ्यांसाठी कशा प्रकारे तंदुरुस्त रहाता यावे यासाठी बास्केटबॉल आणि जिम ची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे असे यावेळी सांगितलेले आहे.
साजिद पटेल यांनी मांडलेल्या सूचनामध्ये आता शाळा सुरू झालेले आहेत.
ज्यांचे आधार कार्ड व बँकेचे खाते नाही अशा मुलांचे आधार कार्ड व बँकेचे खाते उघडण्यात येईल निवासी अस्थिवंग शाळा सावंगी सहारा परिवर्तन जवळ,नायगाव रोड औरंगाबाद येथे12 जुलै शनिवारी रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत आयोजित करण्याचे सांगितलेले आहे.
12 जुलै रोजी निवासी असिव्यांग शाळा सावंगी नायगाव रोड सारा परिवर्तन जवळ येथे आधार कार्ड कॅम्प घेण्यात येणार असल्याचे पोस्टमास्टर सुरेश बनसोडे यांनी सांगितलेल्या आहे.
यावेळी पोस्ट फोरमचे नवीन सदस्य म्हणून मोहम्मद युसुफ खान (वाय के बिल्डर) यांना घेण्यात आलेले आहे.
यावेळी डेप्युटी पोस्ट मास्टर सुनील कोळी, प्रकाश अहिरे, एपीएम अनिल शेळके, सहदेव सातपुते, रजत, पोस्ट फोरमचे ज्येष्ठ मेंबर सुभाष देवकर,अब्दुल कय्यूम पत्रकार, साजीद पटेल, मोहम्मद युसुफ खान (वाय के बिल्डर) आदी उपस्थित होते.