एमजीएम विद्यापीठात कालिदास जयंती साजरी
छत्रपती संभाजीनगर: महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेजेस संस्थेत संस्कृत विभागातर्फे कालिदास जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने कालिदास साहित्य संपदा याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यात संस्थेतील मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी विभागांतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. यावेळी आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.जॉन चेल्लादुराई, संचालक के.पी.सिंग, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व संबंधित उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्कृत विभागातील प्रा.डॉ.प्रज्ञा कोनार्डे यांनी केले. कार्यक्रमास मराठी विभागातील प्रा.डॉ.राम गायकवाड, प्रा.डॉ.मारोती गायकवाड, हिंदी विभागातील प्रा.डॉ.शहानाज बासमेह, प्रा.डॉ.सुरेखा लक्कस, उर्दू विभातील प्रा.डॉ.अस्वद गोव्हर, प्रा.डॉ. साजिद आलम तसेच इंग्रजी विभागातील प्रा.डॉ.रेहाना सय्यद, प्रा.डॉ.सुप्रिया सांगवीकर, प्रा.डॉ.वैशाली माडजे, प्रा.डॉ.इम्रान पठाण, स्त्री अध्यासनच्या प्रा.डॉ. मंजूश्री लांडगे, शिक्षणशास्त्र विभागातील प्रा.डॉ.अमरदीप असोलकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौरभ वांढरे, विशाल अहिरे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृत विभागातील संशोधक स्वाती पुराणिक यांनी तर आभार एमए मराठीच्या पवन शेळके याने मानले.
